fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

आणि एमएस धोनी पुन्हा झाला कर्णधार

कोरोना व्हायरसमुळे भारतात २१ दिवसांचे लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे खेळाडू आणि खेळाशी जोडलेले सर्वजण सध्या सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत.

अशामध्येच भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज आणि देशांतर्गत प्रथम श्रेणी क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती घेणाऱ्या वसीम जाफरने (Wasim Jaffer) शनिवारी (4 एप्रिल) आपल्या आवडत्या अकरा जणांच्या वनडे संघाची निवड केली आहे.

यामध्ये भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीबरोबर (MS Dhoni) इतर ४ भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. जाफरने धोनीला या संघाचे कर्णधारपद सोपविले आहे. याबरोबरच संघाच्या यष्टीरक्षकाची आणि फिनिशरची जबाबदारीही त्याच्यावरच सोपविली आहे.

जाफरने या वनडे संघात सलामी जोडी म्हणून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार रोहित शर्माची (Rohit Sharma) निवड केली आहे.

भारतीय संघाचा माजी विस्फोटक सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवागला (Virendra Sehwag) या संघात स्थान दिलेले नाही. या संघात तिसऱ्या क्रमांकावर वेस्ट इंडीज संघाचा दिग्गज क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स (Vivian Richards) आहे. तसेच चौथ्या क्रमांकावर विराट कोहलीला स्थान दिले आहे.

पाचव्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू एबी डिविलियर्स (AB De Villiers) असून सहाव्या क्रमांकावर बेन स्टोक्सला (Ben Stokes) स्थान दिले आहे.

याव्यितिरिक्त जाफरने आपल्या आवडत्या अकरा जणांच्या संघात एकाही भारतीय गोलंदाजाला स्थान दिलेले नाही. तर गोलंदाजांमध्ये पाकिस्तानच्या २ खेळाडूंची निवड केली आहे. यामध्ये सकलेन मुश्ताक (Saqlain Mushtaq) आणि वसीम अक्रमच्या (Wasim Akram) नावाचा समावेश आहे.

या संघात आठव्या क्रमांकावर अक्रम आहे. तर नवव्या क्रमांकावर शेन वॉर्न (Shane Warne) आणि मुश्ताकला संधी दिली आहे. दहाव्या क्रमांकावर जोएल गार्नर (Joel Garner) आहेत. तसेच अकराव्या क्रमांकावर ग्लेन मॅकग्रा (Glenn McGrath) यांची निवड केली आहे. त्याचबरोबर १२ व्या क्रमांकावरील खेळाडू म्हणून जाफरने रिकी पाँटिंगची निवड केली आहे.

असा आहे वसीम जाफरचा ११ जणांचा वनडे संघ-

सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, विवियन रिचर्ड्स, विराट कोहली, एबी डिविलियर्स, बेन स्टोक्स, एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक), वसीम अक्रम, शेन वॉर्न/ सकलेन मुश्ताक, जोएल गार्नर, ग्लेन मॅकग्रा आणि रिकी पाँटिंग (संघातील १२ वा खेळाडू).

ट्रेंडिंग घडामोडी-

वैतागलेला चहल म्हणतो, मुंबई इंडियन्स, तुम्ही स्वप्न पाहत बसा

-व्हिडीओ: आता केदार जाधव म्हणतोय, गो कोरोना

-भारताचे सर्वात यशस्वी ५ विकेटकिपर, ज्यांनी वनडेमध्ये घडवला आहे इतिहास

-कोरोनाविरुद्धच्या लढाईत माजी महान क्रिकेटर दान करणार आपल्या मौल्यवान वस्तु

You might also like