fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

टीम इंडियासोबतचे ते प्रकरण सायमंड्सला चांगलेच भोवले…झाला व्यसनी

ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू अॅण्ड्रू सायमंड्सने पुन्हा एकदा ‘मंकीगेट’ प्रकरण उकरून काढले आहे. या प्रकरणाला सुमारे दहा वर्षे झाली असली तरी सायमंड्सच्या जीवनातील तो एक न विसरण्याजोगा किस्सा बनला आहे.

“भारतासोबत झालेल्या ‘मंकीगेट’ प्रकरणाने मी मद्यपानाच्या आहारी गेलो. यामुळे माझ्या क्रिकेटच्या  कारकिर्दीला मोठे नुकसान झाले”, असे सायमंड्स म्हणाला आहे.

भारतीय फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने मला ‘मंकी’ म्हटले होते, असा आरोप सायमंड्सने केला होता. ही घटना 2008मध्ये सिडनी कसोटी सामन्या दरम्यान झाली होती. पण हरभजनने या आरोपांचा स्विकार केला नव्हता. तसेच भारतीय संघाने तो दौरा अर्धवट सोडण्याचा विचारही  केला होता.

43 वर्षीय सायमंड्सने त्याला कशाप्रकारे त्या घटनेमुळे पुढील जीवनात अडचणी आल्या हे सांगितले आहे.

“त्या घटनेपासून माझी कारकीर्द माझ्यासमोर संपत चालली होती. म्हणून मी मोठ्या प्रमाणावर मद्यपान करू लागलो. यामुळे माझे आयुष्यच अवघड होऊन बसले”, असे सायमंड्सने ऑस्ट्रेलियाच्या प्रसारमाध्यमांना सांगितले.

“या प्रकरणात मी माझ्या संघसहकाऱ्यांना ओढावून घेतल्याचे मला दु:ख होत आहे. पण मी कुठे चुकलो हे आम्हाला कळलेच नाही”,असेही तो म्हणाला.

“भारतात झालेल्या मालिकेदरम्यान मी हरभजनशी बोललो होतो. त्यावेळीही तो मला मंकी म्हणाला होता. नंतर मी त्याला म्हटले की जर त्याने मला अशी नावे ठेवण बंद नाही केले तर हे प्रकरण हाताबाहेर जाईल.”

ऑस्ट्रेलियासाठी शेवटचा सामना सायमंड्सने 2009ला खेळला होता. पण एक महिन्यानंतर वर्ल्ड टी-20मध्ये त्याने मद्यपानाशी सबंधित काही नियम तोडल्याने ऑस्ट्रलियन क्रिकेटने त्याचा करार रद्द केला होता.

महत्त्वाच्या बातम्या:

ISL 2018: चेन्नईला पहिल्या विजयाची आशा

Video: जेव्हा धोनीच्या मस्करीमुळे घाबरतो ‘हिटमॅन’ रोहित शर्मा

जम्मू-काश्मिरच्या या गोलंदाजाची कमाल, घेतल्या ४ चेंडूत ४ विकेट्स

You might also like