सध्या श्रीलंका क्रिकेट संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर श्रीलंका संघाला दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंका संघ काहीसा पिछाडीवर पडलेला दिसून येतोय. हे दोन्ही सामने श्रीलंकेने जिंकल्यास व भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अहमदाबाद कसोटी ऑस्ट्रेलिया संघाने आपल्या नावे केल्यास, श्रीलंकेला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत खेळण्याची संधी मिळेल. मात्र, असे असतानाच श्रीलंकेचा वरिष्ठ क्रिकेटपटू ऍंजेलो मॅथ्यूज याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीला खडे बोल सुनावले आहेत.
आयसीसी नेहमी कसोटी क्रिकेट वाचवण्याचे तसेच वाढवण्याचे बोलताना दिसते. यासाठी 2019 पासून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची सुरुवात देखील करण्यात आली आहे. मात्र, असे असले तरी याचा फायदा केवळ काहीच मोजक्याच संघांना होत असल्याचे दिसून येते. याच मुद्द्यावर मॅथ्यूज याने सडेतोड प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला,
“आयसीसीसह प्रत्येक जणच कसोटी क्रिकेट वाचवण्याबाबत बोलत असतात. मात्र, प्रामाणिकपणे यासाठी कोणीच प्रयत्न करत नाही. कारण, श्रीलंका संघ वर्षात केवळ पाच कसोटी सामने खेळताना दिसतोय.”
मॅथ्यूज याच्या या आरोपांमध्ये काही तथ्य देखील आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या 2021-2023 या सायकलमध्ये इंग्लंड, भारत व ऑस्ट्रेलिया हे बिग थ्री सर्वाधिक सामने खेळताना दिसून येत आहेत. या सायकलमध्ये इंग्लंडला तब्बल 22 सामने खेळण्याची संधी मिळाली. ऑस्ट्रेलिया व भारत देखील अनुक्रमे 19 व 18 सामने खेळले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने 15 व पाकिस्तानने 14 सामन्यांमध्ये आपला खेळ दाखवला. न्यूझीलंड व वेस्ट इंडिजला प्रत्येकी 13 तर श्रीलंका व बांगलादेशने केवळ 12 सामने या सायकलमध्ये खेळले आहेत.
(Angelo Matthews Questions ICC Test Cricket Betterment Plans He Said Srilanka Not Play More Test)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शुबमनने उंचावली भारतीयांची मान! बनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक ठोकणारा तिसरा युवा खेळाडू, इतर दोघे कोण?
कौतुक तर केलंच पाहिजे! शुबमन गिलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ठोकलं कारकीर्दीतलं दुसरं शतक