पुणे। डेक्कन जिमखाना क्लबच्या वतीने आयोजित रावतेकर ग्रुप पुरस्कृत अनिल जी.रानडे मेमोरियल डेक्कन जिमखाना क्रिकेट लीग 2022 स्पर्धेत साखळी फेरीत रोहन स्ट्रायकर्स, स्नो लेपर्ड्स या संघांनी विजयी कामगिरी कायम ठेवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
डेक्कन जिमखाना क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत चेतन तेलंग(36धावा) याने केलेल्या धावांच्या जोरावर रोहन स्ट्रायकर्स संघाने आयकॉन टायगर्स संघाचा 10 धावांनी पराभव करत सलग तिसरा विजय नोंदवला. चारुदत्त कुलकर्णी(15धावा व 1-11) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर स्नो लेपर्ड्स संघाने ए अँड ए शार्क्स संघाचा 3 धावांनी पराभव करत तिसरा विजय मिळवला. साहिल गोवित्रीकर(1-12 व नाबाद 33धावा) याने केलेल्या सुरेख कामगिरीच्या जोरावर ऍक्वा रायडर्स संघाने मराठा वॉरियर्स संघाचा 7 गडी राखून पराभव केला.
निकाल: साखळी फेरी:
रोहन स्ट्रायकर्स: 6षटकात 4बाद 65धावा(चेतन तेलंग 36(18,4×4,1×6), राही चौधरी 11, निखिल मुंडे 1-12)वि.वि.आयकॉन टायगर्स: 6षटकात 4बाद 55धावा(समीर जोग 16, अभिषेक ताम्हाणे 11, परेश पुंगलिया नाबाद 14, अविनाश गोडबोले 2-7, यश देशपांडे 1-10);सामनावीर-चेतन तेलंग; रोहन स्ट्रायकर्स संघ 10धावांनी विजयी;
स्नो लेपर्ड्स: 6षटकात 3बाद 55धावा(नचिकेत जोशी नाबाद 23(16,2×4), चारुदत्त कुलकर्णी 15, रोहित बर्वे 11, अंकुश जाधव 1-11)वि.वि.ए अँड ए शार्क्स: 6षटकात 4बाद 52धावा(नंदन कामत 19, केतन जठार नाबाद 17, प्रसाद जाधव 10, रोहन पटवर्धन 2-4, चारुदत्त कुलकर्णी 1-11, रोहित बर्वे 1-15);सामनावीर-चारुदत्त कुलकर्णी; स्नो लेपर्ड्स संघ 3धावांनी विजयी;
मराठा वॉरियर्स: 6षटकात 6बाद 61धावा(शुभंकर हार्डीकर 28(15), नितीन हार्डीकर 12, तेज दिक्षीत 2-16, साहिल गोवित्रीकर 1-12)पराभूत वि.ऍक्वा रायडर्स: 5.1षटकात 1बाद 63धावा(साहिल गोवित्रीकर नाबाद 33(18,2×4,2×6), अजिंक्य मेहता नाबाद 12, शैलेश बंगले 11, शुभंकर हार्डीकर 1-16);सामनावीर-साहिल गोवित्रीकर; ऍक्वा रायडर्स संघ 7गडी राखून विजयी
महत्त्वाच्या बातम्या –
हार्दिक पंड्याची गाडी काही थांबेना! हंगामातील सलग तिसऱ्या अर्धशतकामुळे ‘या’ यादीत ठरला ‘टॉपर’
मागील ५ वर्षात आरसीबीसाठी २३ एप्रिल दोनदा ठरलाय काळा दिवस, टाका आकडेवारीवर एक नजर