भारतीय लेगस्पिनर अनिल कुंबळे यांना नुकतेच आयसीसी ‘हॉल ऑफ फेम’मध्ये स्थान देण्यात आले. यानिमित्ताने आयसीसीने एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये स्फीफन फ्लेमिंग, वसीम अक्रम आणि कुमार संगकारा या दिग्गज खेळाडूंनी कुंबळेच्या खेळावर होणाऱ्या प्रभावावर भाष्य केले. कुंबळे हे असे गोलंदाज होते, ज्यांच्याविरुद्ध धावा बनवणे खूप अवघड जात असे. त्यांनी भल्याभल्या फलंदाजांची रात्रीची झोप उडवली असल्याचे संगकाराने सांगितले आहे.
आयसीसीने शेअर केलेल्या व्हिडीओत संगकारा म्हणाले की, “कुंबळेनी एक फलंदाज म्हणून माझी अनेक वेळा झोप उडवली आहे. ते जुन्या काळातील लेग स्पिनर नव्हते. ते एक ऊंच असे गोलंदाज होते, जे मैदानावर ऊंच सरळ आणि अचूक अशाप्रकारे गोलंदाजी करत होते. त्यांच्याविरुद्ध धावा काढणे सोपे नव्हते. ते खूपच बाउन्स गोलंदाजी करत असत. त्यांच्या चेंडूची गती वेगवान होती. काही वेळेस तर फलंदाजाला धावा बनवायच्या खूप कमी संधी मिळायच्या.”
अनिल कुंबळे हे एक उत्तम व्यक्तिमत्व आहेत. त्याचबरोबर ते एक अतिशय उत्कृष्ट क्रिकेटपटू राहिले आहेत. कुंबळे हे कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक विकेट घेणारे (619) तिसरे गोलंदाज आहेत. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनकडे कुंबळेंना मागे टाकायची संधी मिळाली आहे. या वेगवान गोलंदाजाने 614 विकेट घेतल्या आहेत.
अनिल कुंबळेंची नेहमीच योजना तयार असते- माहेला जयवर्धने
कुमार संगकारा यांच्या बरोबरच माजी श्रीलंकन क्रिकेटपटू माहेला जयवर्धने यांनीही अनिल कुंबळेंचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, “त्यांची शक्ती काय आहे हे त्यांना माहिती आहे. ते त्या स्थानापासून लांब जात नाहीत आणि फलंदाजाला सतत प्रश्न विचारतात. जर तुम्ही अनिल कुंबळेचा सामना फलंदाज म्हणून केला तर तुम्हाला माहिती होईल की, तुमच्या विरोधात देखील त्यांच्या योजना तयार असतात.”
“If you were a batsman facing Anil Kumble, you knew that he had a plan for you."
One of India’s finest on #ICCHallOfFame ????️ pic.twitter.com/55Et7OWpdV
— ICC (@ICC) May 20, 2021
दरम्यान पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम यांनी कुंबळेंचे वर्णन अन्य स्पिनरपेक्षा वेगळे असल्याचे सांगितले. वसीम अक्रम म्हणाले, “मला आठवते की त्यांनी दिल्लीत आमच्याविरुद्ध दहा विकेट घेतल्या. मी शेवटचा खेळाडू होतो. मला आठवत आहे की, ही कालचीच गोष्ट आहे. इतर सर्व गोलंदाजापेक्षा वेगळे लेग स्पिनर अनिल कुंबळे आहेत.”
महत्त्वाच्या बातम्या-
धोनीच्या काळात हिट ठरलेली ‘कुलचा’ जोडी का तुटली? स्वत: युजवेंद्र चहलने सांगितले कारण
‘माही’च्या मृत गर्लफ्रेंडचे फोटो तूफान व्हायरल, जाणून घ्या तिच्या मृत्यूचे कारण