---Advertisement---

IND vs ENG: अनिल कुंबळेने सांगितला भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचा निकाल, केली धक्कादायक भविष्यवाणी 

On: गुरूवार, जानेवारी 25, 2024 10:37 AM
India-vs-England-Test
---Advertisement---

India vs England Test: भारतीय संघाचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज अनिल कुंबळे याने भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेबाबत (IND vs ENG) मोठी भविष्यवाणी केली आहे. या कसोटी मालिकेची धावसंख्या काय असेल आणि कोणता संघ जिंकेल हे त्याने सांगितले. कुंबळेच्या मते, रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ही कसोटी मालिका 4-1 ने जिंकेल.

गेल्या दशकात भारताला घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत पराभूत करण्यात कोणत्याही संघाला यश आलेले नाही. इंग्लंडने भारतीय भूमीवर शेवटचा इतिहास 2012 मध्ये रचला होता आणि भारतीय संघाचा पराभव केला होता. आता बेन स्टोक्स याच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघ यावेळी भारताला पराभूत करू शकतो की नाही हे पाहायचे आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे.

अनिल कुंबळेने माध्यमांशी बोलताना भारत-इंग्लंड कसोटी मालिकेबाबत भाकीत केले. तो म्हणाला, “भारतीय संघ ही मालिका नक्कीच जिंकेल असे मला वाटते. माझ्या मते, पाचही कसोटी सामन्यांचे निकाल लागतील कारण या दोन्ही संघांचा कसोटी क्रिकेटकडे दृष्टिकोन सारखाच आहे. हवामानामुळे खेळात व्यत्यय आला नाही, तर पाचही सामन्यांचे निकाल कळतील. माझ्या मते इंग्लंडचा संघ एक सामना जिंकेल आणि भारतीय संघ चार सामने जिंकेल.”

या कसोटी मालिकेत इंग्लंडच्या बॅझबॉल पद्धतीची खूप चर्चा होत आहे. मात्र, भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. ‘बेसबॉल’ पद्धतीने खेळल्यास सामना दीड-दोन दिवसांत संपेल, असा इशारा त्यानी इंग्लंडला दिला आहे. (Anil Kumble told India-England test series result gave a shocking prediction)

हेही वाचा

‘मॅक्युलम समोर बसला आहे’, अक्षर पटेलने कसोटी मालिकेबाबत विचारलेल्या प्रश्नावर दिले मजेशीर उत्तर
IND vs ENG: नाणेफेक जिंकून इंग्लंडचा फलंदाजी करण्याचा निर्णय, रोहित शर्माने या ‘3’ फिरकीपटूंना संघात दिले स्थान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---