प्रत्येक व्यक्तीचा आवडता क्रिकेटपटू आणि आवडता कलाकार असतोच असतो. बॉलिवूडध्येही असे अनेक कलाकार आहेत, ज्यांना भारतीय संघाचे क्रिकेटपटू आवडतात. त्यात सध्या तुफान चर्चेत असलेली अभिनेत्री तृप्ती डिमरी हिच्या नावाचाही समावेश आहे. तृप्ती सध्या तिच्या ‘ऍनिमल’ या सिनेमाच्या यशामुळे चर्चेचा विषय ठरत आहे. एकीकडे संपूर्ण देश तृप्तीच्या अभिनय आणि लूक्सचे कौतुक करत आहे, पण 29 वर्षीय अभिनेत्रीने नुकताच एका मुलाखतीत खुलासा केला की, ती भारतीय संघाच्या एका दिग्गज खेळाडूची मोठी चाहती आहे.
कोण आहे आवडता क्रिकेटपटू?
‘ऍनिमल’ (Animal) सिनेमात ‘झोया’ (Zoya) पात्र साकारणाऱ्या तृप्ती डिमरी (Tripti Dimri) हिने एका मुलाखतीत खुलासा केला की, विराट कोहली (Tripti Dimri Favorite Cricketer) हा तिचा आवडता क्रिकेटपटू आहे. सोशल मीडियावर ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीची एक क्लिप व्हायरल होत आहे. मात्र, हा व्हिडिओ कधीचा आहे, याची पुष्टी अद्याप झाली नाहीये.
https://twitter.com/TheRevanthTweet/status/1732739397655912911?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1732739397655912911%7Ctwgr%5E7353b42f4d6f54ba73fe20ede21221f0ecb20d69%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.sportskeeda.com%2Fcricket%2Fnews-animal-actress-tripti-dimri-calls-virat-kohli-favorite-cricketer-watch-video
भारतीय (Team India) संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली (Vitat Kohli) याचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. आता त्याच्या चाहत्यांच्या यादीत अभिनेत्री तृप्ती डिमरी (Actress Tripti Dimri) हिच्या नावाचाही समावेश झाला आहे.
विश्वचषक 2023 स्पर्धेनंतर विराट ब्रेकवर, अनुष्कासोबत लंडनमध्ये घालवतोय सुट्ट्या
विराट कोहली विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेनंतर ब्रेकवर आहे. त्याने अनिश्चित काळासाठी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. सध्या विराट पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि लेकीसोबत लंडनमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे.
दुसरीकडे, भारतीय संघ आगामी दौऱ्यासाठी बुधवारी (दि. 6 डिसेंबर) दक्षिण आफ्रिकेला पोहोचला आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विन यांसारखे वरिष्ठ खेळाडू दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी काही काळानंतर तिथे पोहोचतील. 26 डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. (animal actress tripti dimri named her favorite cricketer see video)
हेही वाचा-
‘घमंडी कुठचा… देव तुला कधीच माफ नाही करणार’, गंभीरच्या ‘त्या’ पोस्टवर भडकला श्रीसंत, LLC करणार चौकशी
‘दोघांना एका खोलीत आणा आणि…’, वॉर्नर-जॉन्सन वादात रिकी पाँटिंगची उडी