पुणे, २२ ऑक्टोबर २०२३: पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे पीएमडीटीए मानांकन डीईएस फर्ग्युसन कॉलेज ब्रॉन्झ सिरिज २०२३ स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलांच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत बिगरमानांकीत अनिश वडनेरकर याने सातव्या मानांकित मोहम्मद तल्हाचा ६-४ असा संघर्षपूर्ण पराभव करून सनसनाटी निकाल नोंदवला.
फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्टवर आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलांच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित सनत कडलेने सहाव्या मानांकित समीहन देशमुखचा टायब्रेकमध्ये ६-५(१) असा पराभवकेला. चौथ्या मानांकित वीर चतुरने अनुराग वैद्यनाथनचा ६-४ असा तर, पाचव्या मानांकित नीव गोगियाने सोळाव्या मानांकित अधिराज दुधानेचा ६-२ असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: १४ वर्षांखालील मुले: उपांत्यपूर्व फेरी:
सनत कडले(१) वि.वि.समीहन देशमुख(६) ६-५(१);
वीर चतुर(४)वि.वि.अनुराग वैद्यनाथन ६-४;
नीव गोगिया(५) वि.वि.अधिराज दुधाने(१६) ६-२;
अनिश वडनेरकर वि.वि.मोहम्मद तल्हा(७)६-४;
१४ वर्षांखालील मुली: उपांत्यपूर्व फेरी:
वैष्णवी नागोजी(१)वि.वि.दिविजा पाटील ६-१;
परी हिंगले(४)वि.वि.देवेशी पडिया ६-४;
आयुश्री तरंगे(३) वि.वि.शरण्या सावंत ६-२;
अवनी देसाई(२)वि.वि.शर्मीष्टी कोद्रे ६-२;
१२ वर्षांखालील मुली: उपांत्यपूर्व फेरी:
अवनी देसाई(१)वि.वि.श्रीजा कलशेट्टी ६-०;
आस्मि ढवळे वि.वि.नियती देसाई ७-५;
गीतिका पावस्कर(३)वि.वि.स्वरा पवार ६-४;
सान्वी रॉय वि.वि.अनन्या बिलगीकर ६-१;
महत्वाच्या बातम्या –
कोणत्याच दिग्गजाला न जमलेली कामगिरी शमीला जमली, विश्वचषकातील खास विक्रम वेगवान गोलंदाजाच्या नावावर
शमी शानदारच! कुंबळेचा मोठा पराक्रम उद्ध्वस्त करत रचला आणखी एक कीर्तीमान