इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) सहाव्या हंगामातील (आयपीएल २०१३) स्पॉट फिक्सिंग प्रकरणाने मोठा वाद निर्माण झाला होता. यानंतर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एस श्रीसंत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला या तीन खेळाडूंवर आजीवन बंदी घातली होती. श्रीशांतची शिक्षा कमी झाल्यानंतर तो मैदानावर उतरला आहे. दरम्यान बीसीसीआय लोकपाल डीके जैन यांनीही आपली शिक्षा कमी करून ७ वर्षे केली असल्याचा दावा अंकित चव्हाण याने केला आहे. परंतु आतापर्यंत त्याला यासंदर्भात बीसीसीआयकडून अधिकृत पत्र मिळालेले नाही.
अंकितने केला हा दावा
एका क्रिकेट संकेतस्थळाशी बोलताना ३५ वर्षीय अंकित चव्हाण म्हणाला की, “मी मुंबई क्रिकेट असोसिएशनला या विषयावर पाठिंबा मागितला आहे. लोकपाल जैन यांनी हा निर्णय महिनाभरापूर्वी ३ मे रोजी दिला होता. अशा परिस्थितीत माझ्यावर लादलेली बंदी सप्टेंबर २०२० मध्ये संपली आहे. मी लोकपालांच्या आदेशाने बीसीसीआयला पत्र लिहिले होते. परंतु अद्याप त्यांच्याकडून काहीच उत्तर आले नाही. या कारणास्तव मी एमसीएकडे मदत मागितली आहे, जेणेकरून मी पुन्हा मैदानात येऊ शकेन.”
एमसीए बैठकीत होणार चर्चा
मुंबई क्रिकेट असोसिएशनची अॅपेक्स कौन्सिल बैठक ११ जून रोजी होणार आहे. सभेच्या अजेंड्यातही अंकित चव्हाण याचा विषय आहे. मात्र असोसिएशनच्या पदाधिकाऱ्याने सांगितले की, अंकितच्या पत्रामुळे आम्ही त्यास अजेंड्यात समाविष्ट केले आहे. परंतु या विषयावर आम्ही काहीही करू शकत नाही, हे आमच्या अधिकार क्षेत्राच्या पलीकडे आहे. हा निर्णय बीसीसीआयलाच घ्यावा लागेल.
स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अंकित चव्हाण राजस्थान रॉयल्ससाठी खेळताना दोषी आढळलेला.
श्रीसंतने केले आहे पुनरागमन
बीसीसीआयने वेगवान गोलंदाज एस श्रीसंतवरही आजीवन बंदी घातली होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्याची शिक्षा कमी करण्यात आली. २००७ टी२० विश्वचषक आणि २०११ वनडे विश्वचषक जिंकणार्या भारतीय संघात श्रीशांतचा समावेश होता. सध्याच्या हंगामात त्याला मुश्ताक अली ट्रॉफीसाठी केरळ संघातही स्थान मिळाले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
सचिनची फटकेबाजी ओळखीची, पण लाराचा फटका समजत नसे; ‘या’ गोलंदाजाची प्रतिक्रिया
‘मला आणखी दोन विश्वचषक खेळायचे आहेत,’ दिग्गज भारतीय यष्टीरक्षकाचा आशावाद
चौथ्या दिवशी हवामानासह किवी गोलंदाजांनीही केले कमबॅक, लॉर्डस कसोटीत इंग्लंड पिछाडीवर