इंग्लंड क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना झाला आहे. या दोन संघात 27 नोव्हेंबर पासून टी20 सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होईल. कोरोना या रोगाच्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून खेळाडू जैव सुरक्षित वातावरणात वास्तव्यास आहेत.
सर्व खबरदारी घेऊनही काही दिवसांआधी दक्षिण आफ्रिका संघातील एका खेळाडूला कोरोनाची लागण झाली होती. त्यातच या संघातील पुन्हा एका खेळाडूचा कोव्हिड-19 चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, त्यामुळे या संघात चिंतेचं वातावरण आहे.
इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघात शुक्रवारी (20 नोव्हेंबर) सराव सामना होणार होता. मात्र,पुन्हा एका खेळाडूचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला.
दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने याबद्दल स्पष्टीकरण देताना म्हटले की, “कोरोनाची लागण झालेल्या दुसऱ्या खेळाडूचा याआधी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या खेळाडूशी काहीही संबंध नाही. खेळाडूला एका विशिष्ट ठिकाणी क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलं आहे.”
“गोपनीयता राखण्याच्या कारणामुळे खेळाडूंची नावे उघड करण्यात आलेली नाही. दक्षिण आफ्रिका संघ व्ययस्थापन इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि त्यांच्या खेळाडूंच्या संपर्कात आहे, जेणेकरून पारदर्शकता टिकून राहील आणि पुढची योजना आखण्यात यश येईल.” असेही सीएसएने स्पष्ट केले.
दक्षिण आफ्रिका दौर्यावर इंग्लंड संघ 3 वनडे आणि 3 टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. टी20 मालिका 27 नोव्हेंबरपासून सुरू होईल, तर वनडे मालिका 4 डिसेंबरपासून सुरू होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
लंका प्रीमियर लीगमागची साडेसाती संपेना; दोन खेळाडू कोरोनाबाधित
‘मला रोहितकडून सेहवागसारख्या खेळींची अपेक्षा’, भारतीय दिग्गजाचे ‘हिटमॅन’बद्दल मोठे वक्तव्य
‘ही तर १० कोटींची चिअरलीडर’, सेहवागच्या ‘या’ वक्तव्यावर मॅक्सवेलने दिली तिखट प्रतिक्रिया