दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे बुधवारी (१४ ऑक्टोबर) आयपीएलच्या तेराव्या हंगामातील ३०वा सामना झाला. या सामन्यात गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावण्याच्या चुरसीने उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सने १३ धावांनी राजस्थान रॉयल्सला मात दिली. दरम्यान दिल्लीच्या वेगवान गोलंदाजाने एन्रिक नॉर्किएने इतिहास रचला.
त्याने राजस्थानच्या डावातील तिसऱ्या षटकाचा पाचवा चेंडू तब्बल १५६.२२ किमी दर ताशी वेगाने टाकला. हा आयपीएलच्या १३ हंगामाच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू ठरला आहे. यापुर्वी हा विक्रम डेल स्टेनच्या नावावर होता. त्याने २०१२ साली १५४.४० किमी दर ताशी वेगाने वेगाने गोलंदाजी करत हा किर्तीमान मिळवला होता.
मात्र, नॉर्किएने तिसऱ्या षटकातील सलग ४ चेंडू १५० किमी दर ताशी वेगाच्या आसपास टाकले आहेत. यासह आयपीएलमधील ३ सर्वात वेगवान चेंडू फेकण्याचा विक्रम त्याने नावावर करत, सर्वांना चकित केले आहे.
असे असले तरी, नॉर्किएच्या त्या षटकात राजस्थानच्या जोस बटलरने एकापाठोपाठ एक सलग २ चेंडू सीमारेषेबाहेर पाठवले. पण नॉर्किएने षटकातील शेवटच्या चेंडूवर बटरलचा त्रिफळा उडवला. त्यामुळे बटलर ९ चेंडूत २२ धावा करत मैदानाबाहेर गेला.
Seriously good heat from @AnrichNortje02 156.2kmph ????
✊ @IPL @StarSportsIndia— @BrettLee_58 (@BrettLee_58) October 14, 2020
Fire meets fire. Pace lights up the timber and wins. Nortje-Buttler. Fabulous viewing #DCvRR #IPL2020 pic.twitter.com/s2VjuJPR5R
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) October 14, 2020
What is the procedure to reply with Anrich Nortje? ????#DCvRR https://t.co/nNPvAe1Uyz pic.twitter.com/ixWtPCu83R
— Delhi Capitals (@DelhiCapitals) October 14, 2020
https://twitter.com/SitamMoharana/status/1316428173442252803
Fastest ball in the history of IPL at 156.2Kph ????????#RRvsDC #IPL2020 #AnrichNortje #RRvsDC pic.twitter.com/f5rreXx4hh
— ???????? (@Shivoham___) October 14, 2020
नॉर्किएच्या या अफलातून गोलंदाजीला पाहिल्यानंतर वेगाचा बादशहा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रेट लीने त्याचे कौतुक केले आहे. तर भारतीय संघाचे प्रशिक्षक रवि शास्त्रीही त्याची प्रशंसा करण्यासाठी स्वत:ला रोखू शकले नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या-
“मी आज जे काही आहे ते फक्त तुमच्यामुळेच”, गंभीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ‘तो’ झाला भावूक
Video : ‘करो या मरो’ स्थितीत गोलंदाजाने दिल्या एका षटकात १९ धावा, मग धोनीने चांगलाच झापला
पर्पल आणि ऑरेंज कॅप प्रकरण म्हणजे डोळ्यात धूळफेक, पाहा कुणी केलाय दावा
ट्रेंडिंग लेख-
गुळाचे व्यापारी असणाऱ्या कोल्हापूरच्या पाटलाचा मुलगा भारताकडून खेळला अवघा एकच सामना, पण…
प्रतिभेला संधी हीच तर आयपीएलची खासियत.! एकेकाळचा बॉल बॉय आज बनलाय संघाचा आधार
भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १७ – क्रिकेटचा गंभीर शिलेदार