जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आमनेसामने आहेत. दोन्ही संघामध्ये विजेतेपदासाठी चुरस दिसून येत आहे. अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवशी स्टँडमधील एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की, विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा आणि कॅप्टन रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह एकत्र स्टॅंडमध्ये बसल्या आहेत. आता तुम्ही म्हणाल यामध्ये विशेष काय. मात्र, त्या दोघी एकमेकींशी बऱ्याच दिवसांपासून कसलाही संवाद साधत नाहीत. या व्हायरल फोटोमुळे यांच्यातील युद्ध संपल्याचे बोलले जात आहे.
खरं तर, काही दिवसांपासून रितिका आणि अनुष्काबद्दल अशा बातम्या येत होत्या की, दोघींमध्ये सर्व काही ठीक नाही. 2019 पासून रोहितने (Rohit Sharma) विराट (Virat Kohli) आणि अनुष्काला इन्स्टावर अनफॉलोही केले होते. यानंतर विराट आणि अनुष्कानेही एक गुप्त संदेश पोस्ट केला. त्या पोस्टमुळे या अफवेला हवा मिळाली. 4 वर्षांपूर्वी पत्रकार परिषदेत रितिका आणि अनुष्काबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता, तेव्हा रवी शास्त्रींनी त्याचे उत्तर दिले नाही.
अनुष्का कधीही दिसली नाही
एवढेच नाही तर रितिका (Ritika Sajdeh) आणि अनुष्का (Anushka Sharma) दोघीही क्वचितच एकत्र दिसून यायच्या. अनेकदा सामन्यावेळी दोघीही स्टेडियममध्ये उपस्थित असायच्या मात्र दोघीही वेगवेगळ्या ठिकाणी बसलेल्या दिसायच्या. रितिका अनेकदा तिच्या मैत्रीनींसोबतचे सामन्यामधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते, पण तिच्या फोटोमध्ये अनुष्का कधीच दिसली नाही. (World Test Championship Final)
अनुष्का आणि रितिकामध्ये सर्व ठीक आहे!
बऱ्याच दिवसांनी दोघी एकाच फ्रेममध्ये दिसून आल्या आहेत. खुप दिवसांनी दोघी एकत्र एकच ठिकाणी दिसल्या आहेत. या व्हायरल फोटोमुळे दोघींमध्ये सर्व काही ठीक असल्याचं चाहत्यांच म्हणणं आहे. दोघींचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. बुधवारी झालेल्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली. तर, पहिल्या सत्रात भारताने उस्मान ख्वाजा आणि डेव्हिड वॉर्नरच्या रूपाने ऑस्ट्रेलियाला (India vs Australia) दोन मोठे धक्के दिले. खेळाच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने तीन गडी गमावून 327 धावा केल्या आहेत. यामध्ये सर्वांत मोठा वाटा ट्रॅव्हिस हेड 146 (travis Head) आणि स्टीव्ह स्मिथ 95 (Steve Smith) यांच्या धावांचा आहे. या दोन्ही फलंदाजांमध्ये 251 धावांची नाबाद भागीदारी झाली. दोन्ही फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WTC Final : ड्रिंक्स ब्रेकदरम्यान कॅप्टन रोहितला ‘टिप्स’ देताना दिसला अश्विन, सर्वत्र रंगलीय फोटोची चर्चा
‘MPLमधील खेळाडू भविष्यात IPL आणि देशाच्या संघात चमकतील…’, लिलावानंतर रोहित पवारांचे लक्षवेधी ट्वीट