fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

अबब! अफगाणिस्तानच्या युवा खेळाडूने मारले एकाच ओवरमध्ये 6 षटकार

शारजाह येथे अफगाणिस्तान प्रिमिअर लीग(एपीएल) सुरु आहे. या स्पर्धेतील काबुल झ्वानन संघाच्या हजरतुल्ला झझाइने 6 चेंडूत 6 षटकार मारण्याची किमया केली आहे.

या प्रेक्षणीय कामगिरीच्या जोरावर हजरतुल्ला झझाइचे नाव आता क्रिकेटच्या विवीध प्रकारात सलग 6 षटकार मारणाऱ्या दिग्गजांच्या यादीत समाविष्ट झाले आहे.

या यादीत सर गॅरफिल्ड सोबर्स, रवि शास्त्री, हर्षल गिब्ज, युवराज सिंग, इन्झमाम-उल-हक अॅलेक्स हेल्स, आणि रविंद्र जडेजा विराजमान आहेत.

बाल्ख लिजन्ड्सविरुद्ध फलंदाजी करताना अब्दुल्ला मझारीने टाकलेल्या तिसऱ्या षटकात हजरतुल्लाने सलग 6 षटकार ठोकले आहेत. त्याची ही जबरदस्त खेळी काबुल झ्वाननला पराभवापासून वाचु शकली नाही. बाल्ख लिजन्ड्सने या सामन्यात 41 धावांनी विजय मिळवला.

अब्दुल्ला मझारी या फिरकी गोलंदाजाने सामन्यात एकमेव षटक टाकले त्यात त्याने 37 धावा दिल्या.

या सामन्यात षटकारांची आतषबाजी पाहयला मिळाली. प्रथम फलंदाजीला आलेल्या बाल्ख लिजन्ड्सच्या फलंदाजांनी तुफानी फटकेबाजी करत 20 षटकात 244 धावांचा डोंगर उभा केला.

बाल्ख लिजन्ड्सचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलने अवघ्या 48 चेंडूत 80 धावांची आतषबाजी केली. ख्रिस गेलने तब्बल 10 षटकार मारले.

हजरतुल्ला झझाइने 17 चेंडूत 62 धावांची खेळी केली. नियमित अंतराने गडी बाद होत गेल्याने काबुल झ्वानन संघाला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

गेलने या सामन्यात फक्त 12 चेंडूत आपले अर्धशतक पुर्ण केले. टी-20 सामन्यात असा पराक्रम करणारा तो युवराज नंतर दुसराच फलंदाज ठरला आहे.

युवराजने 2007 साली टी-20 विश्वचषक स्पर्धेत इंग्लडविरूद्धच्या सामन्यात आपले अर्धशतक अवघ्या 12 चेंडूत पूर्ण केले होते. तब्बल अकरावर्षांनी गेलने युवराजच्या या विक्रमाची काल बरोबरी केली.

महत्वाच्या बातम्या-

You might also like