आज (2 मार्च) ख्राईस्टचर्च (Christchurch) येथे न्यूझीलंड विरुद्ध भारत (New Zealand vs India) संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना पार पडला. हा सामना न्यूझीलंडने 7 विकेट्सने जिंकला आहे. तसेच मालिकाही 2-0ने खिशात घातली आहे. या सामन्याबरोबरच भारतीय संघाचा न्यूझीलंड दौराही याठिकाणी संपला.
दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माची (Rohit Sharma) आठवण झाली.
रोहित न्यूझीलंडविरुद्ध 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत भारतीय संघाचा भाग होता. यामध्ये भारताने टी20 मालिकेत न्यूझीलंडला 5-0ने व्हाईटवॉश दिला होता. परंतु या मालिकेतील शेवटच्या सामन्यात रोहितला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला संघातून बाहेर पडावे लागले होते.
यावेळी रोहितबद्दल बोलताना विराट म्हणाला की, “आंतरराष्ट्रीय टी20 मालिका आमच्यासाठी चांगली ठरली. वनडे मालिकेत युवा खेळाडूंना पुढे जाताना पाहून बरे वाटले. कारण रोहित शर्मा दुखापतीमुळे वनडे मालिकेत भारतीय संघात नव्हता आणि माझा फॉर्मही वाईट होता.”
या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना विराट म्हणाला की, आम्ही या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यापासूनच चांगली कामगिरी केलेली नाही. तसेच न्यूझीलंड संघाच्या गोलंदाजांनी भारतीय संघाच्या फलंदाजांवर दबाव निर्माण केला. ज्याचा फायदा त्यांना झाला.
परंतु दुसऱ्या कसोटी सामन्याबद्दल बोलताना विराट म्हणाला की, या सामन्यातील पहिल्या डावात एक फलंदाज म्हणून आमच्या संघाने चांगली खेळी केली. परंतु दुसऱ्या डावात गोलंदाजांच्या मेहनतीवर फलंदाजांनी पाणी फेरले.
कसोटी क्रिकेटमधील अव्वल क्रमांकाच्या भारतीय संघाबद्दल बोलताना विराट म्हणाला की, “आम्हाला या दौऱ्यातून काही सकारात्मक गोष्टी पहायला मिळाल्या. परंतु कसोटी संघ म्हणून आम्ही ज्याप्रकारे खेळलो ते काही चांगले नव्हते. आम्ही चांगली कामगिरी केली नाही. हे आम्हाला स्विकारावे लागेल.”
महत्त्वाच्या बातम्या-
–भारत दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिका संघाची घोषणा, या खेळाडूला मिळाली पहिल्यांदाच संधी
–विराटचं असं वागणं बरं नव्हं! आता या व्यक्तीवर काढला पराभवाचा राग
–असे झाले थाला धोनीचे चेन्नईमध्ये स्वागत, पहा व्हिडिओ