औंरंगाबाद, दि 25 ऑक्टोबर 2023: ईएमएमटीसी तर्फे आयोजित व एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या ईएमएमटीसी – एमएसएलटीए 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या अकराव्या मानांकित आराध्य म्हसदेने पाचव्या मानांकित कर्नाटकच्या दिगंत एमचा 5-7 6-3, 6-4 असा तीन सेटमध्ये पराभव सनसनाटी निकाल नोंदवला.
औंरंगाबाद येथील ईएमएमटीसी टेनिस कॉम्प्लेक्सवर सुरु असलेल्या मुलांच्या गटात अव्वल मानांकित तेलंगणाच्या हृतिक कटकमने महाराष्ट्राच्या तेराव्या मानांकित आयुष पुजारीचे आव्हान 6-0, 6-3 असे संपुष्टात आणले. तामिळनाडूच्या सहाव्या मानांकित फजल अली मीर याने दिल्लीच्या दहाव्या मानांकित नव्या यादवचा 6-4, 6-1 असा तर, तिसऱ्या मानांकित शिवतेज शिरफुलेने पंधराव्या मानांकित श्लोक चौहानचा 6-4, 6-1 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. गुजरातच्या आठव्या मानांकित ओम पटेलने महाराष्ट्राच्या नील केळकरचा टायब्रेकमध्ये 6-4, 6-7(3), 6-3 असा पराभव करून आगेकूच केली.
दुसऱ्या मानांकित हरियाणाच्या तविश पहवाने मध्यप्रदेशच्या ईशान येडलापल्लीला 6-3, 6-3 असे पराभुत केले. मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या पाचव्या मानांकित आनंदिता उपाध्याय हिने तेलंगणाच्या अव्यक्ता रायावरपूचा 6-2, 6-2 असा सहज पराभव केला. तामिळनाडूच्या तिसऱ्या मानांकित सविता भुवनेश्वरनने आपली राज्य सहकारी दीपशिका विनयगममूर्तचा 6-1, 6-2 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले. महाराष्ट्राच्या सातव्या मानांकित पार्थसारथी मुंढेने इरा देशपांडेचे आव्हान 6-3, 6-1 असे मोडीत काढले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ: उप-उपांत्यपूर्व फेरी:
मुले:
हृतिक कटकम(तेलंगणा)(1)वि.वि.आयुष पुजारी(महा)(13) 6-0, 6-3;
फजल अली मीर(तामिळनाडू)(6) वि.वि.नव्या यादव(दिल्ली)(10) 6-4, 6-1;
शिवतेज शिरफुले(महा)(3)वि.वि.श्लोक चौहान(15)6-4, 6-1;
आराध्या म्हसदे(महा)(11)वि.वि.दिगंत एम(कर्नाटक)(5)5-7 6-3, 6-4;
ओम पटेल(गुजरात)(8)वि.वि.नील केळकर(महा)(12) 6-4, 6-7(3), 6-3;
प्रकाश सरन(कर्नाटक)(4) वि.वि.क्रिशांक जोशी(महा)(14) 6-0, 6-4;
तविश पहवा(हरियाणा)(2)वि.वि.ईशान येडलापल्ली(मप्र) (16) 6-3, 6-3;
मुली: प्राची मलिक(हरियाणा)(1)वि.वि.रीत अरोरा(हरियाणा(13)6-4, 6-0;
आनंदिता उपाध्याय (महा)(5) वि.वि.अव्यक्ता रायावरपू(तेलंगणा)6-2, 6-2;
सविता भुवनेश्वरन(तामिळनाडू)(3)वि.वि.दीपशिका विनयगममूर्त(तामिळनाडू)(14) 6-1, 6-2;
कार्तिका पद्मकुमार(कर्नाटक)वि.वि.आहिदा सिंग(कर्नाटक)(10)6-0, 6-1;
पार्थसारथी मुंढे (महा(7)वि.वि.इरा देशपांडे(महा)6-3, 6-1;
दिया अग्रवाल वि.वि.तेविशा नंदनकर(गुजरात) 6-3, 6-1;
अविपशा देहुरी(9) वि.वि.श्राव्या नुम्बुरी(तामिळनाडू)(8)6-2, 4-1 सामना सोडून दिला;
आहान(2)वि.वि.नीशा एन्जा(तेलंगणा)(16)7-6(3), 6-3;
महत्वाच्या बातम्या –
नजर हटी दुर्घटना घटी! मेंडिसच्या साधलेल्या संधीचे सर्वत्र कौतुक, पाहा व्हिडिओ
“अफगाणिस्तान संघाचा कोच होण्याआधी जडेजाने माझा सल्ला घेतला”, पाकिस्तानी खेळाडूचा दावा