fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

बेटावर फसलेल्या दिग्गज खेळाडूच्या ‘सेक्स टेप’ ब्लॅकमेलरच्या हातात, आता…

Argentina footballer ezequiel lavezzi was blackmailed for sex video

कोरोना व्हायसरमुळे जवळपास सर्व देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक लोक घरात आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. तर, काही लोक आपल्या खास व्यक्तिसोबत या कठीण वेळेचा सामना करत आहेत.

अशात, अर्जेंटीनाचे दिग्गज फुटबॉलपटू एजेकियल लवेजी यांच्यासाठी हा कठीण काळ जास्तच कठीण झाला आहे.

झाले असे की, ३५ वर्षीय लवेजी हे त्यांच्या प्रेमिकासोबत आईसलँडवर (बेटावर) आपला वेळ घालवत होते. यावेळी त्यांचे बरेच सेक्स व्हिडिओ एका ब्लॅकमेलरच्या हाती लागले आणि आता तो ब्लॅकमेलर लवेजी यांना त्यांचे ते व्हिडिओ लीक करण्याची धमकी देत आहे. Argentina footballer ezequiel lavezzi was blackmailed for sex video.

अर्जेंटीनाच्या न्यायालयात लवेजी यांनी तक्रार केली आहे की, “त्यांना ब्लॅकमेल केले जात आहे. तसेच, त्यांना धमकी दिली जात आहे की जर त्यांनी प्रत्येक व्हिडिओसाठी ५ हजार डॉलर म्हणजे ४ लाख रुपये दिले नाहीत. तर, त्यांचे सेक्स व्हिडिओ आणि फोटो इंटरनेटवर व्हायरल केले जातील.”

कोरोना व्हायरसमुळे अर्जेंटीनामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे लवेजी त्यांची प्रेयसी ब्राझीलियन मॉडेल आणि अभिनेत्री नतालिया बोरगेससोबत कॅरेबियन आईसलँडवर वेळ घालवत आहेत. सुत्रांनुसार नतालियालाही सोशल मीडिया अकाउंटवरून धमकी दिल्या जात आहेत.

२००७साली अर्जेंटीनाकडून चिलीविरुद्ध आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण करणारे लवेजी हे २००८मध्ये बीजिंग ऑलिंम्पिकचे सुवर्णपदक जिंकणाऱ्या संघाचा भाग होते. शिवाय, त्यांनी आपल्या संघाला २०१४मध्ये फीफा विश्वचषकाच्या आणि २०१५मध्ये कोपा अमेरिकाच्या फुटबॉल अंतिम सामन्यापर्यंत नेले होते.

परंतु, कोपा अमेरिकाच्या फुटबॉल अंतिम सामन्यात दुखापतीमुळे त्यांना संघातून बाहेर काढण्यात आले होते आणि त्यांचा संघ चिली संघाकडून पराभूत झाला होता. अर्जेंटीना संघाकडून लवेजी यांनी एकूण ५१ सामने खेळले आहेत. यात त्यांनी ९ गोल केले होते.

ट्रेंडिंग घडामोडी-

युवराने केलं रोहित, सचिनला ‘हे’ हटके चॅलेंज, पाहुया काय करतात सचिन- रोहित

ठरलं तर! ‘या’ तारखेला टीम इंडिया उतरणार मैदानावर

ऍशेस मालिकेत १ धाव करुन ठरला होता हिरो, आता कोरोनामुळे करियरच आलंय…

You might also like