रशिया फिफा विश्वचषकातून अर्जेंटीना संघ बाहेर पडल्यामुळे निराश होऊन लियोनल मेस्सी हा आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेणार याची चर्चा सुरू आहे.
मात्र यावर अर्जेंटीनाचा माजी खेळाडू कार्लोस तेनेझ याने पूर्णविराम दिला आहे.
“संघाला मेस्सीची गरज आहे. ही स्पर्धा संघासाठी आणि मेस्सीसाठी खूप वाईट ठरली पण याने निराश न होता अजून चांगले खेळावे”, असे तेनेझ म्हणाला.
बाद फेरीतून अर्जेंटीना 4-3 असा फ्रान्सकडून पराभूत झाल्याने स्पर्धेतून बाहेर पडला. यामुळे त्यांचे प्रशिक्षक जॉर्ज सॅम्पौली यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला.
साखळी फेरीत अर्जेंटीना आईसलँड विरुद्ध अनिर्णीत तर क्रोएशिया विरुद्ध 3-0ने पराभूत झाला होता. तिसऱ्या सामन्यात मात्र नायजेरियाला 2-1ने हरवत बाद फेरीत प्रवेश केला होता.
पाच बॅलन दी-ओर विजेत्या मेस्सीने या स्पर्धातील चार सामन्यात 1 गोल केला. 2016मध्ये कोपा अमेरीका स्पर्धेत अर्जेंटीना अंतिम सामन्यात पराभूत झाली होती तेव्हापासूनच त्याच्या निवृत्तीची चर्चा सुरू होती.
मेस्सीने 128 आंतरराष्ट्रीय सामन्यात 65 गोल केले असून सर्वाधिक गोल करणाऱ्यामध्ये तो सध्या खेळत असलेल्या खेळांडूमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.
“मेस्सीने स्वत:चा विचार करावा. सध्याची परिस्थिती बघता संघाला विजेतेपद मिळवून देणे खूप अवघड वाटत आहे”, असे तेनेझ म्हणाला.
“एक खेळाडू आणि अर्जेंटीयन असल्याने मला त्याला सांगावेसे वाटते की त्याने आत्ताच निवृत्ती घेऊ नये. कारण तो एक महत्त्वाचा खेळाडू आहे. सध्या त्याला मी आराम करून थंड डोक्याने विचार कर असे सांगितले आहे”,असे तो पुढे म्हणाला.
यादरम्यान संघासाठी नवीन प्रशिक्षकाची निवड करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–फिफा विश्वचषक विजेत्या फ्रान्ससाठी या गोष्टी ठरल्या लकी…
–एशियन गेम्स २०१८मध्ये भारतीय फुटबॉल संघ खेळणार?