कतार येथे सुरू असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषकाचा अंतिम सामना गत विजेता फ्रान्स व लॅटिन अमेरिकन देश अर्जेंटिना यांच्या दरम्यान खेळला गेला. दोहा येथील लुसेल स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआउटमध्ये बाजी मारत विश्वचषक आपल्या नावे केला. यासह लिओनेल मेस्सी याच्या शानदार कारकिर्दीची अखेर विजयाने झाली.
Argentina win the World Cup on penalties! 🏆 @adidasfootball | #FIFAWorldCup
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) December 18, 2022
विजेतेपदाचे दावेदार म्हणून या सामन्यात उतरलेल्या फ्रान्सवर दिग्गज लिओनेल मेस्सी याच्या नेतृत्वातील अर्जेंटिना संघाने सुरुवातीपासून वर्चस्व राखले. पहिल्या वीस मिनिटात फ्रान्स संघ केवळ एकदाच अर्जेंटिनाच्या क्षेत्रात धडक देऊ शकला. 20 व्या मिनिटाला फ्रान्सच्या बचावपटूने केलेल्या धसमुसळ्या खेळाचा फायदा उठवत मेस्सीने मिळालेली पेनल्टी सत्कारणी लावत संघाला आघाडीवर नेले.
पहिल्या गोलचा जल्लोष चाहते करत असतानाच मेसीने आणखी एक आक्रमण रचले. डाव्या बगलेतून त्याने रचलेल्या आक्रमणाला ऍंजेल डी मारिया याने गोलच्या स्वरूपात बदलले. 36 व्या मिनिटाला झालेल्या या गोलमुळे अर्जेंटिना संघ सामन्यात पुढे गेला. संघ पिछाडीवर पडलेला असताना, फ्रान्सच्या प्रशिक्षकांना 40 व्या मिनिटालाच आपल्या संघात बदल करावे लागले. संपूर्ण स्पर्धेत चांगले कामगिरी केलेले जिरू व थुरम यांना प्रशिक्षक डीडीअर डेश्चॅप यांनी बाहेर घेतले. अतिरिक्त मिळालेल्या सात मिनिटात दोन्ही संघांनी बचावात्मक खेळावर भर दिला.
दुसऱ्या हाफमध्ये मात्र फ्रान्सचा संघ अतिशय आक्रमक पद्धतीने खेळताना दिसला. सामना एक वेळ अर्जेंटिनाच्या बाजूने गेला आहे असे वाटत असताना स्पर्धेत पाच गोलल झळकावलेला किलीयन एम्बाप्पे फ्रान्सच्या मदतीला धावला. 80 व्या मिनिटाला मिळालेली पेनल्टी त्यांनी गोलमध्ये ढकलत पिछाडी भरून काढली. पुढच्याच मिनिटाला त्याने आणखी एक सुरेख गोल करत फ्रान्सला सामन्यात बरोबरी करून दिली. अखेरच्या दहा मिनिटात फ्रान्सच्या संघाने गोल करण्याचे आणखी दोन प्रयत्न केले. मात्र, ते प्रयत्न सफल झाले नाहीत.
अतिरिक्त वेळेस गेलेल्या सामन्यातील पहिला हाफ अर्जेंटिना संघाने गाजवला. त्यांना गोल करण्याच्या दोन संधी मिळाल्या होत्या. मात्र, त्यांना त्यात यश आले नाही. अतिरिक्त वेळेतील दुसऱ्या हाफच्या तिसऱ्याच मिनिटाला लिओनेल मेस्सी याने पुन्हा एकदा करामत दाखवत गोल मारत अर्जेंटिनाला विजेतेपदाच्या जवळ आणले. अतिरिक्त वेळ संपण्यासाठी केवळ तीन मिनिटांचा अवधी शिल्लक असताना फ्रान्सला पुन्हा एकदा पेनल्टी बहाल करण्यात आली. एम्बाप्पेने ती पेनल्टी गोल मध्ये बदलत संघाला पुन्हा बरोबरी साधून दिली. अतिरिक्त वेळेतील अखेरचे काही सेकंद शिल्लक असताना अर्जेंटिनाच्या गोल रक्षकाने मीयाने याचा प्रयत्न हाणून पाडत संघाला पराभवापासून वाचवले. त्यामुळे सामना पेनल्टी शूट आउटमध्ये गेला. अर्जेंटिनाने चार र फ्रान्सला दोनच गोल करता आल्याने अर्जेंटिनाने तिसऱ्यांदा विजेतेपद आपल्या नावे केले.
Argentina won fifa 2022 Football World Cup Messi now World Cup winner
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहित शर्मा दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळताना दिसणार का? पत्रकार परिषदेत केएल राहुलने केला खुलासा
कसोटीमध्ये अक्षर पटेलचा बोलबाला, भारताच्या क्रिकेट इतिहासात केली कोरले आपले नाव