भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर हा मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. मागील आठवड्यात सुरू झालेल्या रणजी ट्रॉफी 2022-2023 हंगामात त्याने गोवा संघासाठी पदार्पण केले. त्याने पहिल्याच सामन्यात शतक झळकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यानंतर आता भारतात माजी अष्टपैलू युवराज सिंग याने देखील त्याचे कौतुक केले.
मागील वर्षीपर्यंत मुंबईसाठी खेळणारा अर्जुन यावेळी गोवा संघासाठी खेळत आहे. त्याला मुंबईसाठी प्रथमश्रेणी पदार्पण करता आले नव्हते. त्यामुळे त्याने गोव्यासाठी खेळण्याचा मार्ग स्वीकारला. राजस्थानविरूद्धच्या पहिल्याच सामन्यात शतक झळकावून त्याने हे पदार्पण साजरे केले. त्याच्या या शानदार खेळल्यानंतर युवराज सिंग हा त्याचे कौतुक करताना दिसला. युवराज म्हणाला,
“मी त्याला अगदी जवळून पाहिले आहे. त्याच्यामध्ये नक्कीच एक मोठा क्रिकेटपटू होण्याची क्षमता दिसून आली. तो गोष्टी खूप लवकर शिकतो. त्याच्याकडे तुफान वेग आहे. तर, फलंदाजी तो कधीही धोकादायकच ठरतो.”
अर्जुन यावर्षीच्या क्रिकेट हंगामा आधी युवराजचे वडील व माजी भारतीय क्रिकेटपटू योगराज सिंग यांच्याकडे प्रशिक्षण घेताना दिसला होता. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली दोन महिने सराव केल्यानंतर त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी व विजय हजारे ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी केली. योगराज यांनी देखील अर्जुनचे कौतुक केले होते. रणजी ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात त्याने राजस्थानविरुद्ध 104 भावांची खेळी केलेली. तर, झारखंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याने पहिल्या दिवशी उत्कृष्ट गोलंदाजी करत विरोधी संघाला रोखण्याचे काम केले. त्याची अशीच कामगिरी सुरू राहिल्यास आयपीएलच्या पुढील हंगामात त्याला खेळण्याची संधी मिळू शकते.
(Arjun Tendulkar Have Potential To Become Great Cricketer; Yuvraj Singh Said)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्रिकेट ऑस्ट्रेलियाची नाचक्की! ब्रिस्बेन कसोटी जिंकूनही व्हावे लागले अपमानित; वाचा संपूर्ण प्रकरण
बॉक्सिंग डे कसोटीत वॉर्नला वाहिली जाणार खास श्रद्धांजली; क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केले नियोजन