पुणे| पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना यांच्या वतीने आयोजित व महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या पुणे जिल्हा अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात अर्जुन वेल्लूरी याने दुसऱ्या मानांकित पियुश जाधवचा टायब्रेकमध्ये 6-5(12-10) असा सनसनाटी विजय मिळवत आगेकूच केली.
एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत मुलांच्या गटात रुद्र नेहटेने अनिरुद्ध सर्वाननचा 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव केला. नील बोन्द्रेने करण चोरडियाला 6-4 असे पराभूत केले. तिसऱ्या मानांकित अर्जुन किर्तनेने अर्णव गुप्ताचा 6-0 असा एकतर्फी पराभव केला.
मुलींच्या गटात नवव्या मानांकित रितिका मोरेने शर्मिष्ठा कोडरेचा 6-0 असा तर, दुसऱ्या मानांकित अनन्या देशमुखने मनस्वी वाकोडेचा 6-1 असा सहज पराभव करून पुढच्या फेरीत प्रवेश केला. सातव्या मानांकित श्रावणी देशमुखने गौतमी आर्यावर 6-0 असा विजय मिळवला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: दुसरी फेरी: 14 वर्षाखालील मुले:
मनन अगरवाल(5) वि.वि.सिद्धांत कुलकर्णी 6-0;
अर्जुन वेल्लूरी वि.वि.पियुश जाधव(2) 6-5(12-10);
रुद्र नेहटे वि.वि.अनिरुद्ध सर्वानन 6-4;
अर्जुन किर्तने(3) वि.वि.अर्णव गुप्ता 6-0;
अथर्व येलभर वि.वि.अद्वैत गुंड 6-0;
नील बोन्द्रे वि.वि.करण चोरडिया 6-4;
14 वर्षाखालील मुली:
रितिका मोरे(9) वि.वि.शर्मिष्ठा कोडरे 6-0;
अनन्या देशमुख(2) वि.वि.मनस्वी वाकोडे 6-1;
श्रावणी देशमुख(7) वि.वि.गौतमी आर्या 6-0;
श्रेया होनकन वि.वि.रेहमान अहाना 6-0;
ध्रुवा माने वि.वि.समा माहिका 6-0;
मृणाल शेळके(3)वि.वि.भावना अगरवाल 6-4.
महत्त्वाच्या बातम्या-
‘विराट कोहली कप्तानी छोडो’ ‘या’ कारणाने सुरू झालाय ट्विटरवर ट्रेंड
याला म्हणतात आदर! इतिहास रचल्यानंतर हात बांधून मेन्टॉर धोनीपुढे उभे राहिले पाकिस्तानचे खेळाडू- VIDEO