Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कुटुंब अन् माजी क्रिकेटपटूंनी केली अर्शदीपची पाठराखण! म्हणाले, ‘हे सगळं…’

कुटुंब अन् माजी क्रिकेटपटूंनी केली अर्शदीपची पाठराखण! म्हणाले, 'हे सगळं...'

September 6, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
Arshdeep Singh

Photo Courtesy: Twitter/ACCMedia1


आशिया कप 2022 च्या सुपर 4 सामन्यात पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला सोशल मीडियावर सतत ट्रोल केले जात आहे. पाकिस्तानच्या डावाच्या 18व्या षटकात त्याने रवी बिश्नोईच्या गोलंदाजीवर असिफ अलीचा झेल सोडल्यामुळे हे घडत आहे. त्यावेळी आसिफने खातेही उघडले नव्हते. मात्र यानंतर पाकिस्तानी फलंदाजाने 8 चेंडूत 16 धावा करत संघाला विजय मिळवून दिला.

या सामन्यानंतर अर्शदीपवर सोशल मीडियावर बरीच टीका होत असून त्याला सातत्याने ट्रोल केले जात आहे. या टीकेदरम्यान अर्शदीप सिंगच्या आई-वडिलांचे विधान समोर आले आहे, ज्यामध्ये त्यांनी या टीकेला सकारात्मक पद्धतीने घेत असल्याचे म्हटले आहे.

काय म्हणाले वडील दर्शन सिंह?
अर्शदीपचे वडील दर्शन सिंह यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, त्यांनी अर्शदीपचे ट्रोलिंग सकारात्मक घेतले आहे. दर्शन म्हणाला, “काही प्रॉब्लेम नाही. लोकांच्या अपेक्षा खूप होत्या. त्यांना अधिकारही दिले आहेत. मुलाचे संपूर्ण लक्ष आता पुढील सामन्यावर आहे आणि आम्ही त्याला समजावून सांगितले आहे की पुढील सामन्यावर लक्ष केंद्रित करा. टिप्पण्यांपासून दूर राहा आणि शांतता राखा.

Mohali, Punjab | "We went to watch the match. India-Pak match is always interesting. Fans get emotional, angry when their team loses and say a few words. We are taking it positively and there is no problem," says Darshan Singh, father of Indian cricketer Arshdeep Singh pic.twitter.com/UqHvr7GbNC

— ANI (@ANI) September 5, 2022

काय म्हणाल्या आई दलजीत कौर?
23 वर्षीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगची आई दलजीत कौर म्हणाली, “कोणीही चुका करतो. लोकांचं काम आहे ते म्हणू दे, काहीही असो. जर लोक खेळाडूशी बोलत असतील तर याचा अर्थ ते देखील त्याच्यावर प्रेम करतात. हे सर्व आम्ही सकारात्मक घेत आहोत.

अर्शदीपच्या समर्थनार्थ अनेक क्रिकेटपटू समोर आले
अर्शदीप सिंगच्या पालकांपूर्वी अनेक वर्तमान आणि माजी क्रिकेटपटू त्याच्या मदतीला आले आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या पाच विकेट्सच्या पराभवानंतर युवराज सिंगच्या आधी टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग अर्शदीपच्या समर्थनार्थ मैदानात उतरले. अर्शदीपबद्दल बकवास बोलू नका, असे आवाहन भज्जीने ट्विटरच्या माध्यमातून लोकांना केले आहे.

त्याचवेळी, सामन्यानंतर विराट म्हणाला की, आम्ही सर्व माणूस आहोत आणि आमच्याकडून चुका होतात. विराटने त्याचं उदाहरणही दिलं की, जेव्हा तो त्याची पहिली चॅम्पियन्स ट्रॉफी खेळत होता, तेव्हा तो पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीच्या चेंडूवर बेजबाबदार शॉट खेळत होता.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-

Breaking: सुरेश रैनाची आयपीएलमधून निवृत्ती, संपवले बीसीसीआयसोबतचे सर्व संबंध!
सुपर-4 मध्ये श्रीलंकेशी भिडणार भारत, जाणून घ्या दुबईच्या हवामानाचा अंदाज आणि पिच रिपोर्ट
संघ हरला तरी टीम इंडिया मालामाल! बीसीसीआयला मिळाला नवा स्पॉन्सर; इतके कोटी पडणार पदरात


Next Post
Sanjana-And-Bumrah

'तुला कळत नाही का**!' फोटोखाली चुकीची कमेंट करणाऱ्याला संजना गणेशनने झापलं

Virat Kohli & Rohit Sharma

'त्याला वेळोवेळी सपोर्ट केला तरीही...', बीसीसीआय अधिकाऱ्याने काढली विराटची उणीधुणी

Yuzvendra-Chahal

चहलला काढा आणि 'त्याला' घ्या! माजी दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143