अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी कब्जा मिळवला आहे. तेथील नागरिक यामुळे पुरते भयभीत झाले असून सर्वत्र आराजकता माजली आहे. तालिबान्यांच्या अमानुष छळाचा शालेय विद्यार्थी, महिला, सहकारक्षेत्र, व्यवसाय अशा विविध क्षेत्रांवर परिणाम होत असून याचा फटका क्रिकेटला ही बसणार अशी भीती एका अभिनेत्रीला सतावत आहे.
अभिनय क्षेत्रात कार्यरत असलेली अर्शी खान आणि अफगाणिस्तान संघाचा क्रिकेटपटूसोबत यांचा येत्या ऑक्टोबर महिन्यात साखरपुडा होणार आहे. परंतु, अर्शीला चिंता सतावतेय की, अफगानिस्तानमध्ये जे काही सुरू आहे. त्याचा फटका तिच्या वैयक्तिक आयुष्यावर होऊ शकतो.
कोण आहे अर्शी खान?
अर्शी खान ही सावित्रीदेवी हॉस्पिटल अँड कॉलेज, इश्क में मर जावा आणि विष सारख्या मालिकांमध्ये अभिनय करताना दिसून आली आहे. तसेच बिग बॉस १४ मध्ये येण्यापूर्वी ती बिग बॉस ११ ची स्पर्धक होती. ती या शोमध्ये दुसऱ्यांदा आली होती. या शोमध्ये तिची उर्दू भाषा चाहत्यांच्या पसंतीची ठरली होती. तसेच सलमान खानने देखील तिच्या या बोलीचे तोंडभरून कौतुक केले होते.(Arshi Khan fears her engagement with an Afghanistan Cricketer could be called off)
अर्शी खानच्या आनंदी आयुष्यात आता भीतीचे सावट पसरले आहे. याचे कारण तालिबान आहे. कारण अर्शी खान आणि अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू यांचा येत्या ऑक्टोबर महिन्यात साखरपुडा होणार आहे. तो क्रिकेटपटू कोण आहे, याचा तिने खुलासा केला नाहीये. तिचे म्हणणे आहे की, तो मुलगा तिच्या वडिलांना देखील आवडला आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अर्शी खानने म्हटले होते की, “माझा ऑक्टोबरमध्ये अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूशी साखरपुडा होणार आहे. माझ्या वडिलांनाही तो मुलगा आवडला आहे. पण तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा केल्यामुळे आम्हाला हे नाते संपवावे लागू शकते.”
तसेच ती पुढे म्हणाली की,”मी अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूसोबत संपर्कात होते. तो माझ्या वडिलांच्या मित्राचा मुलगा आहे. तसेच मी आणि तो एक चांगले मित्र आहोत. मला विश्वास आहे की, माझे वडील आता माझ्यासाठी एक चांगला भारतीय मुलगा शोधतील.”
महत्त्वाच्या बातम्या –
“लोकं फक्त महत्वाच्या लोकांबद्दल बोलतात”, अजिंक्य रहाणेचे टीकाकारांना सडेतोड उत्तर
विश्वचषकात पाच शतके झळकावूनही आनंदी नव्हता रोहित, ‘हे’ होते कारण