चेम्सफोर्ड | बुधवारी (२५ जुलै) कौंटी क्रिकेट मैदानावर एसेक्स विरुद्ध सुरु झालेल्या सामन्यापूर्वी भारतीय संघ व्यवस्थापनाने या सराव सामन्याचे पिच आणि मैदान खराब असल्याची तक्रार केली होती.
याबाबत स्पष्टीकरण देताना रवी शास्त्रींनी खुलासा केला की, सध्याचा भारतीय संघ कोणत्याही परिस्थितीत वाईट कामगिरीसाठी पळवाट काढणार नाही.
“माझे तत्वज्ञान सोपे आहे. तुमच्या देशात आल्यानंतर मी पिचबाबत कोणतीही तक्रार करणार नाही, तुम्ही आमच्याकडे आल्यानंतर कोणतीही तक्रार करायची नाही.” असे रोखठोक मत शास्त्रींनी व्यक्त केले.
“मी या सामन्यापूर्वी मैदान व्यवस्थापनाला सांगितले होते की, हे पिच जसे आहे तसेच राहुद्या.” असे शास्त्री म्हणाले.
“तुम्ही पहाल भारतीय संघ या दौऱ्यात इथली परिस्थीती किंवा पिचबाबत कोणतीही तक्रार करताना दिसणार नाही. आम्ही इथे जिंकायला आलो आहोत. इंग्लंडला पराभूत करणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे.” असे रवी शास्त्री म्हणाले.
भारताच्या इंग्लड विरुद्धच्या कसोटी मालिकेला १ ऑगस्टपासून सुरवात होणार आहे.
यामधील पहिला सामना १ ऑगस्ट रोजी बर्मिंघहम येथे होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
-केवळ काही तासांच्या फरकाने भारतीय संघ खेळणार दोन वनडे सामने
–निराश मनोज तिवारीने निवड समितीला धरले धारेवर, ट्विटरवरुन जोरदार टीका करत केले ट्रोल