पुणे। पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या वतीने आयोजित आठव्या पीवायसी-पुसाळकर प्रीमियर लीग क्रिकेट 2021 स्पर्धेत अंतिम फेरीत प्रसाद जाधव(नाबाद 40धावा व इशांत रेगे(नाबाद 42 धावा) यांनी केलेल्या धावांच्या जोरावर आर्यन स्कायलार्कस संघाने लाईफसायकल स्नोलेपर्ड्स संघाचा 7 गडी राखून पराभव करत विजेतेपद संपादन केले.
पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत प्रथम फलंदाजी करताना स्नोलेपर्ड्स संघाने 6 षटकात 2बाद 94 धावा केल्या. यात आश्विन शहाने 15 चेंडूत 3चौकार व 4षटकाराच्या मदतीने 43धावा, अक्षय ओकने 17 चेंडूत 5चौकार व 1षटकाराच्या मदतीने 36 धावा करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर नचिकेत जोशीने नाबाद 11 धावा काढून संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. याच्या उत्तरात स्कायलार्कस संघाने हे आव्हान 5.3 षटकात 1 बाद 100धावा करून पूर्ण केले. यामध्ये इशांत रेगेने 12 चेंडूत 2चौकार व 5 षटकारासह नाबाद 42धावा, प्रसाद जाधवने 17 चेंडूत 4चौकार व 3 षटकाराच्या मदतीने नाबाद 40 धावा केल्या. या दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी 28 चेंडूत 84 धावांची भागीदारी करून संघाला सहज विजय मिळवून दिला. सामनावीर इशांत रेगे ठरला.
स्पर्धेतील विजेत्या स्कायलार्कस संघाला ज्ञानेश्वर आगाशे स्मृती करंडक प्रदान करण्यात आला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, पुसाळकर ग्रुपचे विजय पुसाळकर, रोहन पुसाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्लबचे मानद सचिव सारंग लागू, क्लबच्या क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड, होडेकचे अभिजीत खानविलकर, ब्रिहंस ग्रीन लीफचे आशुतोष आगाशे, बेलवलकर हाऊसिंगचे समीर बेलवलकर, सुप्रिम कॉन्स्ट्रो प्रॉडक्ट्सचे आमिर आजगावकर, अभिषेक ताम्हाणे, निरंजन गोडबोले, रणजित पांडे, इंद्रजित कामतेकर, देवेंद्र चितळे, शिरीष आपटे, सिद्धार्थ दाते, कर्णा मेहता व कपिल खरे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी:
लाईफसायकल स्नोलेपर्ड्स:6 षटकात 2बाद 94 धावा(आश्विन शहा 43(15, 3×4,4×6), अक्षय ओक 36(17,5×4,1×6), नचिकेत जोशी नाबाद 11, अंकुश जाधव 1-11)पराभुत वि.आर्यन स्कायलार्कस: 5.3 षटकात 1 बाद 100धावा(इशांत रेगे नाबाद 42(12, 2×4,5×6), प्रसाद जाधव नाबाद 40(17,4×4,3×6), अंकुश जाधव 11, नकुल ओगळे 1-15); सामनावीर-इशांत रेगे; आर्यन स्कायलार्कस संघ 7 गडी राखून विजयी
इतर पारितोषिके:
सर्वोत्कृष्ट फलंदाज: अक्षय ओक(196 धावा, स्नोलेपर्ड्स);
सर्वोत्कृष्ट गोलंदाज: देव शेवाळे(8विकेट);
मालिकावीर: इशांत रेगे(146धावा)
सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक: आश्विन शहा
मोस्ट व्हॅल्युएबल वरिष्ठ खेळाडू: राजन जोशी
मोस्ट व्हॅल्युएबल कुमार खेळाडू: असिम देवगावकर
सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक: अक्षय ओक
महत्त्वाच्या बातम्या –