शुक्रवारी (७ मे) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड जाहीर केली. या दौऱ्यासाठी भारतीय संघात प्रमुख्याने २० खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. तर ४ राखीव खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाला न्यूझीलंड विरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. तसेच त्यानंतर इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे.
या संपूर्ण दौऱ्यासाठी गुजरातचा मध्यमगती गोलंदाज अर्झन नागवासवाला याची राखीव खेळाडूंमध्ये निवड झाली आहे. ही निवड झाल्यानंतर अर्झनने त्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटले आहे की त्याच्यासाठी हा सुखद धक्का होता.
आएएनएसशी बोलताना अर्झन म्हणाला, ‘ही बातमी ऐकल्यानंतर मी पहिल्यांदा माझ्या आई-वडीलांना फोन केला. मी खूप उत्साहीत झालो होतो. मी रस्त्यावर थांबू शकत नव्हतो कारण कोविड-१९च्या नियमाप्रमाणे तुम्हाला कारमधून बाहेर येण्याची परवानगी नाही.’
तो म्हणाला, ‘मी इतका थकलो होतो की मी मुश्किलीने फोन उचलू शकत होतो आणि बोलू शकत होतो. मला या सगळ्याची अपेक्षाच नव्हती. सर्वांना विश्वास होता की मला एक दिवस संधी मिळेल. मलाही आत्मविश्वास होता. पण तरीही पण हे अनपेक्षित आणि आश्चर्यकारक होते.’
अर्झन पुढे त्याच्या गोलंदाजीबद्दल बोलताना म्हणाला, ‘कदाचीत असे असू शकेल की मी डावखरी वेगवान गोलंदाज असल्याचा फायदा झाला. तसेच माझ्यासाठी मागील हंगाम चांगला ठरला होता. मी घरी गेल्यावर माझ्या आई-वडीलांना घट्ट मिठी मारली. माझे मित्र माझी वाट पाहात होते.’
२३ वर्षीय अर्झनचा आदर्श दिग्गज क्रिकेटपटू झहीर खान आहे. विशेष म्हणजे अर्झन २०२१ आयपीएल हंगामासाठी मुंबई इंडियन्सचा नेट गोलंदाज होता. त्यामुळे त्याला झहीर खानबरोबर वेळ घालवण्याची संधी मिळाली. याबद्दल हा खूप खास अनुभव असल्याचे अर्झनने सांगितले.
अर्झन म्हणाला, ‘झहीरने त्याच्या गोलंदाजीबद्दल काही सांगितले नाही. त्याने मला सर्व ठिक असल्याचे सांगितले. पण झहीरने मला सांगितले की जर तुम्ही चांगल्याप्रकारे सराव केला, तर तुमच्या गोलंदाजीला अधिक फायदा होईल. त्याने मला चांगल्याप्रकारे चांगल्याप्रकारे सराव करण्यास सांगितला आणि काही तांत्रिक गोष्टी सांगितल्या. मी डावखरी आहे आणि आमच्या जिल्ह्यातच काय पण राज्य स्थरावरही खुप डावखरी खेळाडू नव्हते. मी झहीर सरांना पाहायचो आणि मला वेगवान गोलंदाजीत हळूहळू रस निर्माण झाला.’
अर्झनसाठी २०१९-२० हंगाम खुपच चांगला ठरला. त्याने रणजी ट्रॉफीमध्ये या हंगामात ८ सामन्यांत ४१ विकेट्स घेतल्या होत्या. या दरम्यान त्याने एका डावात ५ विकेट्स घेण्याची कामगिरी ३ वेळा केली. तसेच १ वेळा सामन्यात १० विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती.
याबरोबरच यावर्षी झालेल्या सय्यद मुश्ताक अली आणि विजय हजारे ट्रॉफीमध्येही त्याने चांगली कामगिरी केली होती. त्याने सय्यद मुश्ताक अली २०२१ स्पर्धेत ९ विकेट्स आणि विजय हजारे ट्रॉफी २०२१ स्पर्धेत १९ विकेट्स घेतल्या होत्या. त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉपीमध्ये महाराष्ट्र विरुद्ध १९ धावांच ६ विकेट्स घेतल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
पीटरसनने सांगितले ‘या’ कारणांमुळे सप्टेंबरमध्ये इंग्लंडला व्हावे उर्वरित आयपीएल २०२१ हंगामाचे आयोजन
कोरोनामुळे भारतीय क्रीडासृष्टीतील दोन तारे निखळले; एकाच दिवशी झाले दोन ऑलिंपिक सुवर्णपदकवीरांचे निधन
भारतीय क्रिकेट जगताला धक्का! कोरोनाने घेतला दिग्गज भारतीय स्कोररचा बळी