बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्याची सुरुवात ऑस्ट्रेलियान संघासाठी समाधानकारक राहिली. संघाची धावसंख्या 61 असताना भारताला पहिला विकेट मिळाली, तर 72 धावांवर ऑस्ट्रेलियाला दुसरा झटका बसला. पण तिसऱ्या विकेटसाठी कर्धणार स्टीव स्मिथ आणि सलामीवीर उस्मान ख्वाजा यांनी खेळपट्टीवर काय जमवले. स्मिथने 100 पेक्षा अधिक चेंडूंचा सामना केला आणि सोबतच एक खास विक्रमही नावावर केला.
दरम्यान, ही चौथी वेळ आहे जेव्हा स्टीव स्मिथ (Steve Smith) भारत दौऱ्यावर ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराच्या रूपात 100 पेक्षा जास्त चेंडू खेळला आहे. भारत दौऱ्यावर कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी डावांमध्ये 100 किंवा त्यापेक्षा जास्त चेंडू खेळणाऱ्यांच्या यादीत स्टीव स्मिथ एक पाऊल पुढे आला आहे. कर्णधार म्हणून इंग्लंडचा माजी दिग्गज एलिस्टर कूक (Alastair Cook) याने भारताला सर्वाधिक 7 वेळा 100पेक्षा जास्त चेंडूंची कसोटी इनिंग खेळल्या आहेत. यादीत दुसऱ्या क्रमांकाव ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार किम ह्यूजेस (Kim Hughes) आहेत, ज्यांनी कसोटी संघाचे नेतृत्व करताना भारतात 7 वेळा 100 पेक्षा अधिक चेंडूंच्या इनिंग खेळल्या आहेत.
यादीत तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा महान कर्णधार रिकी पाँटिंग (Ricky Ponting) आहे. पाँटिंगने कर्णधार म्हणून भारतात 5 कसोटी इंग्लंडमध्ये 100पेक्षा जास्त चेंडूंचा सामना केला आहे. चौथ्या क्रमांकावर स्मिथ आला आहे. पाचवा क्रमांका वेस्ट इंडीजचा क्लाईव्ह लाईड (Clive Lloyd) आहेत, ज्यांनी कसोटी कर्णधार म्हणून भारतात 4 इंनिंग्जमध्ये 100 पेक्षा जास्त चेंडूंचा सामना केला. सहावा क्रमांक स्टीफन फ्लेमिंग (Stephen Fleming) यांचा आहे, ज्यांनी ही कामगिरी कारकिर्दीत 4 वेळा केली. स्मिथने आपल्या कसोटी कारकिर्दीतीत भारतात एकूण 6 कसोटी सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून खेळला. त्यातही चार इनिंग्जमध्ये त्याने 100 पेक्षा जास्त चेंडू खेळत भारतीय गोलंदाजांचा घाम काढला.
कर्णधार म्हणून भारत दौऱ्यात सर्वाधिक वेळा 100 पेक्षा जास्त चेंडूंच्या इनिंग्ज खेळणारे खेळाडू
7: एलिस्टर कूक
7: किम ह्यूजेस
5: रिकी पाँटिंग
4: स्टीव स्मिथ*
4: ल्वाईव्ह लाईड
4: स्टीफन फ्लेमिंग
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना गुरुवारी (9 मार्च) अहमदाबादमध्ये सुरू झाला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर ट्रेविस हेड 32 धावा करून रविचंद्रन अश्विनचा शिकार बनला. तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला मार्नस लाबुशेन अवघ्या 3 धावा करून मोहम्मद शमीच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. सामन्याच्या पहिल्या दिवशी चाहापानापर्यंत स्टीव स्मिथ 38, तर सलामीवीर उस्मान ख्वाजा 65 धावांसह खेळपट्टीवर कायम होते.
(As a captain, Steve Smith has played more than 100 balls in 4 Test innings in India)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शार्दुल ठाकूरनंतर दिग्गज गोलंदाज अडकला लग्नबंधनात, आरसीबी भलतीच टेंशनमध्ये, जाणून घ्या कारण
पीसीबीने केली बीसीसीआयची कॉपी! पाकिस्तानमध्येही सुरू झाली महिला टी-20 लीग