विश्वचषक 2023 चा 29 वा सामना रविवारी (29ऑक्टोबर) लखनऊच्या एकना स्टेडियमवर खेळला गेला, ज्यामध्ये भारताने इंग्लंडचा 100 धावांनी पराभव केला. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 9 विकेट्स गमावून 229 धावा केल्या. भारताकडून कर्णधार रोहित शर्मा (87) आणि सूर्यकुमार यादवने (49) सर्वाधिक धावा केल्या. त्याचवेळी संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली खातेही न उघडताच बाद झाला. इंग्लंडच्या बार्मी आर्मीने याबाबत किंग कोहलीची खिल्ली उडवली आहे. यानंतर भारतीय यूट्यूबर आशिष चंचलानी यांनीही त्यांना सडेतोड उत्तर दिले.
भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) विश्वचषकाच्या 13 व्या हंगामात प्रथमच शून्यावर बाद झाला होता. त्याने नऊ चेंडूंचा सामना केला. त्याची विकेट पडल्यानंतर बार्मी आर्मीने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली. या फोटोत दोन बदके पाण्यात पोहताना दिसत आहेत, एका बदकाच्या चेहऱ्याला कोहलीचा चेहरा लावला आहे. आणि पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, “नुकताच मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलो आहे”
कॉमेडी व्हिडिओ बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या आशिष चंचलानी यांनी हे ट्विट रिट्विट केले आणि लिहिले, “मी ऐकले आहे की इंग्लिश मुलींना सौंदर्यात पूर्ण 10 गुण मिळतात, जसे की त्यांच्या संघाच्या गुणतालिकेतील रँकिंग सारखे.”
उल्लेखनीय म्हणजे 230 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना संपूर्ण इंग्लिश संघ 34.5 षटकांत 129 धावांत गडगडला. भारताकडून मोहम्मद शमी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 7 षटकात 22 धावांत 4 विकेट्स घेतल्या. भारतीय संघ या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिला असून त्यांनी दक्षिण आफ्रिकेला मागे टाकून गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले आहे. या स्पर्धेत, ‘मेन इन ब्लू’ आता त्यांचा पुढचा साखळी सामना 2 नोव्हेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध खेळेल, जो मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल. (As soon as Virat was dismissed for zero England Barmy Army mocked Indian YouTuber stopped talking)
म्हत्वाच्या बातम्या
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या पात्रतेची इंग्लंडवर टांगती तलवार, पात्रता फेरीतून पडू शकते बाहेर