इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ऍशेस मालिका 2023मधील दुसऱ्या सामन्याचा शेवट ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानात रविवारी (दि. 2 जुलै) झाला. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने झंझावाती फलंदाजी करत संघाला अडचणीतून बाहेर काढले. विशेष म्हणजे, आधी अर्धशतक, शतक आणि नंतर दीडशतकाचा टप्पाही स्टोक्सने पार केला. त्याने कर्णधारपदाला साजेशी खेळीमुळे सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.
झाले असे की, इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया (England vs Australia) संघातील दुसऱ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी इंग्लंड संघाला विजयासाठी 257 धावांची गरज होती. पाचव्या दिवसातील पहिल्या षटकात म्हणजेच डावातील 32व्या षटकात बेन स्टोक्स याने 70 चेंडूत 29 धावांपासून खेळायला सुरुवात केली होती. त्यांच्यात पाचव्या विकेटसाठी 132 धावांची भागीदारी झाली. बेन डकेट 83 धावांवर बाद झाल्यानंतर स्टोक्सने फटकेबाजी सुरूच ठेवली. त्याने आधी शतक पूर्ण करण्यासाठी 142 चेंडूंचा सामना केला. हे शतक त्याने डावाच्या 56व्या षटकात केले.
स्टोक्सचे दीडशतक
त्यानंतर स्टोक्सने आपली बॅझबॉल क्रिकेट पद्धतीने फलंदाजी करत कॅमरून ग्रीन याच्या 69व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर 2 धावा काढत दीडशतकही पूर्ण केले. स्टोक्सने यावेळी दीडशतक पूर्ण करण्यासाठी 197 चेंडू खेळले. हे दीडशतक त्याने 9 चौकार आणि 9 षटकारांची बरसात करून पूर्ण केले. स्टोक्सने दुसऱ्या डावात 214 चेंडूंचा सामना करताना 155 धावा केल्या. स्टोक्सच्या झंझावाती खेळीमुळे इंग्लंड विजयाच्या जवळ पोहोचला.
Ben Stokes is continuing to tee off ????
Can he pull off a victory for England? ????#WTC25 | #ENGvAUS ????: https://t.co/liWqlPCKqn pic.twitter.com/CyF2hXk2ka
— ICC (@ICC) July 2, 2023
सामन्याविषयी थोडक्यात
या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 10 विकेट्स गमावत 416 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने पहिल्या डावात 325 धावांवरच गुडघे टेकले होते. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाला 91 धावांची आघाडी मिळाली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 279 धावा केल्या. त्यामुळे इंग्लंडला विजयासाठी 370 धावांचे आव्हान मिळाले होते. इंग्लंडने चौथ्या दिवशी 4 विकेट्स गमावत 114 धावा केल्या होत्या. तसेच, पाचव्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी 257 धावांची गरज होती. 72.1 षटकापर्यंत इंग्लंडने स्टोक्सच्या दीडशतकाच्या जोरावर 7 विकेट्स गमावत 301 धावांचा टप्पा पार केला होता. अजूनही इंग्लंडला विजयासाठी 70 धावांची गरज आहे. आता इंग्लंड विजय मिळवते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (ashes 2023 ben stokes hit 151 runs in 197 balls against australia 2nd test)
महत्वाच्या बातम्या-
‘आग लगे बस्ती में, बाबा अपनी मस्ती में’, विंडीज हारताच गेलने शेअर केला व्हिडिओ, चाहत्याची कमेंट चर्चेत
Ashes । कठीण स्थितीत कॅप्टन स्टोक्सचं वादळी शतक! इंग्लंड विजयापासून 128 धावा दूर