दुबई। 14 व्या एशिया कपमध्ये आज (19 सप्टेंबर) भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये सामना रंगणार आहे. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यासाठी भारताच्या 11 जणांच्या संघात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याचे पुनरागमन झाले आहे. तर नवोदीत खेळाडू खलील अहमद आणि वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला वगळण्यात आले आहे.
तसेच पाकिस्तानने 11 जणांच्या संघात कोणताही बदल केलेला नाही. त्यांनी हाँग काँग विरुद्ध खेळवलेला संघच कायम ठेवला आहे.
या सामन्याआधी भारताने कालच (18 सप्टेंबर) हाँग काँगला 26 धावांनी पराभूत केले आहे. तर पाकिस्तनने 16 सप्टेंबरला हाँग काँगलाच 8 विकेट्सने पराभूत केले आहे. त्यामुळे एशिया कपच्या अ गटात अव्वल क्रमांक मिळवण्यासाठी भारत-पाकिस्तान प्रयत्न करतील.
या दोन्ही संघांनी प्रत्येकी एक विजय मिळवला असल्याने आणि हाँग काँग दोन्ही सामन्यात पराभूत झाल्याने पुढील फेरीत प्रवेश पक्का केला आहे.
भारत आणि पाकिस्तान हे संघ वनडेमध्ये आत्तापर्यंत 129 वेळा आमने सामने आले असून यात भारताने 52 सामन्यात बाजी मारली आहे तर पाकिस्तानने 73 सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच 4 सामने हे अनिर्णित राहिले आहेत.
याबरोबरच हे दोन संघ एशिया कपमध्ये वनडेत 11 वेळा आमने सामने आले आहेत. यात दोन्ही संघांनी प्रत्येकी 5 सामने जिंकले असून 1 सामना अनिर्णित राहिला आहे.
तसेच 2016 ला टी20 प्रकारात खेळलेल्या एशिया कपमध्ये या दोन संघांमध्ये झालेल्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता.
याआधी भारत आणि पाकिस्तान हे संघ 2017 ला पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत शेवटचे आमने-सामने आले आहेत. या सामन्यात पाकिस्तानने भारताविरुद्ध विजय मिळवला होता.
असे आहेत 11 जणांचे संघ-
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन(उपकर्णधार), अंबाती रायडू, केदार जाधव, एमएस धोनी (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह.
IND XI: RG Sharma, S Dhawan, A Rayudu, D Karthik, MS Dhoni, K Jadhav, H Pandya, B Kumar, K Yadav, Y Chahal, J Bumrah
— BCCI (@BCCI) September 19, 2018
पाकिस्तान: सर्फराज अहमद (कर्णधार), फकार जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम, शोएब मलिक, शदाब खान, फहीम अशरफ, हसन अली, उस्मान शीनवारी, आसिफ अली , मोहम्मद अमीर.
PAK XI: Imam ul-Haq, F Zaman, B Azam, S Malik, S Ahmed, A Ali, S Khan, F Ashraf, M Amir, H Ali, U Shinwari
— BCCI (@BCCI) September 19, 2018
महत्त्वाच्या बातम्या-
–एशिया कप २०१८: भारत विरुद्ध पाकिस्तान – आज चुकीला माफी नाही
–एशिया कप २०१८: केवळ 16 तासात टीम इंडिया खेळणार दुसरा आंतरराष्ट्रीय सामना
-एशिया कप २०१८: भारताच्या या विक्रमाशी बरोबरी करण्याची पाकिस्तानला संधी