भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. परंतु रविवारी 4 सप्टेंबर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळल्यानंतर अनेकांना आश्चर्य व्यक्त केले. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा माजी दिग्गज इंजमाम उल हक याने स्वतःचे मत व्यक्त केले. भारतीय संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावर त्याने आश्चर्य व्यक्त केली. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातनंतर मंगळवारी म्हणजेच 6 सप्टेंबर रोजी श्रीलंकेविरुद्धच्या खेळताना देखील कार्तिकला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले.
स्वतःच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना इंजमाम उल हक (Inzamam Ul Haq) म्हणाला की, “ज्या पद्धतीचे बदल भारताने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये केले आहेत, त्यातून दिसते की ते दबावात आहेत. त्यांना एवढे बदल करण्याची गरजच नव्हती. दिनेश कार्तिकला एकही चेंडू खेळण्याची संधी मिळाली नाहीये आणि तितक्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर केले. भारताने जी प्लेइंग इलेव्हन निवडली, त्यावर असे वाटते की, ते घाबरलेले आहेत.” दरम्यान, कार्तिकने आशिया चषकातील चालू हंगामात आतापर्यंत फक्त एक चेंडू खेळला आहे, ज्यावर त्याने पाकिस्तानविरुद्ध एक धाव घेतली होती.
बातमी अपडेच होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
धोनीबद्दलच्या वक्तव्यानंतर आता विराटची इंस्टा स्टोरी चर्चेत! पाहा काय लिहिले
रोहितचं नशीब गंडलंय! श्रीलंकेने नाणेफेक जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय, पाहा प्लेइंग 11
जेमिमा रॉड्रिग्ज बिग बॅश लीग खेळणार! ‘या’ संघासोबत केला करार