भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा आणि माजी दिग्गज संजय मांजरेकर यांच्यातील मतभेत जगजाहीर आहेत. यांच्यातील हा वाद २०१९ साली संजय मांजरेकरांच्या एका टिप्पणीमुळे सुरू झाला होता, ज्याची चर्चा आजही होत असते. अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील मंगळवारी (30 ऑगस्ट) खेळल्या गेलेल्या सामन्यात ही बाब पुन्हा एकदा सिद्ध झाली. या सामन्यात मांजरेकर आणि न्यूझीलंडंचा माजी दिग्गज स्कॉट स्टारयर समालोचन करत होते. त्यावेळी मांजरेकरांसोबत असे काही घडले, ज्यामुळे पुढे बोलण्यासाठी त्यांच्याकडे शब्दच उरले नव्हते.
रविवारी (28 ऑगस्ट) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील रोमांचक लढत चाहत्यांना पाहायला मिळाला. भारताने हा सामना 5 विकेट्स जिंकला, पण दोन्ही संघांना कारवाईला सामोरे जावे लागले. षटकांची गती न राखल्यामुळे खेळाडूंच्या मॅच फिसच्या 40 टक्के रक्कम कापली गेली, तसेच शेवटच्या षटकांमध्ये एक अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये ठेवण्यात आला होता. संघांवर झालेल्या या कारवाईविषयी संजय मांजरेकर (Sanjay Majarekar) आणि स्कॉट स्टायरिस (Scott Styris) चर्चा करत होते. तितक्यात कार्यक्रमाची होस्ट मयंती लेंगर हिने मांजरेकरांची चांगलीच फिरकी घेतली.
स्टायरिस म्हणाला की, “आपण पाहिले आहे की, खूप सारे फिरकी गोलंदाजांना शेवटच्या षटकांमध्ये गोलंगादी करायला आवडत नाही. राशिद खानला देखील ही गोष्ट आवडत नाही. जर एक खेळाडू तुमच्याकडे कमी असेल, तर तुमची सगळी रणनिती त्याच पद्धतीने असायला हवी आणि तशीच गोलंदाजी पाहिजे. तेव्हा संघांना दोन्ही बाजूंनी क्षेत्ररक्षण लावण्याऐवजी सीमारेषेच्या एकाच बाजूला क्षेत्ररक्षण लावावे लागेल. याच कारणास्तव संघातील फिरकी गोलंदाजांना थोडी अजून लवकर गोलंदाजी करावी लागेल.”
मांजरेकर या समस्येवर एक उपाय सुचवतात. ते म्हणातात की, “एक खूपच क्वीक सल्ला आणि खूप साधी रणनिती आहे. तुम्हाला फक्त षटके जलद टाकायचे आहेत.” मांजरेकरांचा हा सल्ला ऐकताच कार्यक्रमाची होस्ट मयंती लेंगर म्हणते की, “संजय, प्रत्येकजण रवींद्र जडेजा नसतो. मला असे म्हणावे लागत आहे.” या प्रसंगानंतर संजय मयंती जोर-जोरात हसतानाही दिसली.
https://twitter.com/KuchNahiUkhada/status/1564792001895473152?s=20&t=V28vXEWxQ48ZehqPQmSznQ
दरम्यान, मांजरेकरांनी 2019 मध्ये रविंद्र जडेजाला “बिट्स आणि पिसिस” असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर जडेजाने ट्वीट केले होते की, “ते कसाही असूद्या, मांजरेकरांपेक्षा जास्त सामने खेळले आहेत आणि नेहमी नवीन गोष्टी शिकत पुढे जात आहे. जर एखाद्या क्रिकेटपटूने काहीतरी मिळवले आहे, तर त्याचा सन्मान केला पाहिजे.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
चमकदार विजयासह अंकित, रौनक, अभिनव मुख्य फेरीत
हॉंगकॉंगच्या गोलंदाजाने स्विकारलेय विराटला बाद करण्याचे चॅलेंज; चार वर्षांपूर्वी रोहित-धोनीला दाखवलेला तंबूचा रस्ता
‘टीम इंडिया कार्तिकवर अन्याय करतेय!’ माजी दिग्गजाचा खळबळजनक दावा