आशिया चषक 2023 मधील चौथा सामना बांगलादेशविरुद्ध अफगाणिस्तान 3 सप्टेंबरला होणार आहे. बांगलादेशला आपल्या पहिल्याच सामन्यात श्रीलंकेविरुद्ध पराभव स्विकारावा लागला. तर अफगाणिस्तान संघ आशिया चषकातील आपला पहिला सामना खेळण्यासाठी आज मैदानावर उतरेल. बांगलादेशला पहिल्या सामन्यातच अपयश आल्यामुळे ते आज विजयाच्या दृष्टिने मैदानात उतरतील. तर अफगाणिस्तान स्पर्धेची सुरवात विजयाने करण्याच्या बेतात असेल.
आशिया चषकातील हा चौथा सामना बांगलादेशविरुद्ध अफगाणिस्तान 3 ऑगस्टला पाकिस्तानातील गद्दाफी स्टेडीयमवर 3 वाजता रंगणार आहे. हा सामना ही दोन्ही संघामध्ये टक्करचा होणार आहे. अशातच बांगलादेशला स्पर्धेतील पुढच्या फेरीत पोहच्याचे असेल तर त्यांना हा सामना जिंकावा लागेल.
बांगलादेशविरुद्ध अफगाणिस्तान सामना पहा या ठिकाणी
बांगलादेशविरुद्ध अफगाणिस्तान हा सामना तुम्ही मोबाईल ऍप डिज्नी प्लस हॉटस्टारवर मोफत पाहू शकता. तसेच या सामन्याचे थेट प्रेक्षपण टीव्ही चॅनेल स्टार स्पोर्ट्सला होणार आहे.
दरम्यान भारतीय संघ आणि पाकिस्तान संघ यांच्यात 2 ऑगस्टला चालू असलेला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. भारतीय संघाची फलंदाजी झाल्यानंतर पाऊस सुरू झाला. जवळपास 2 तास वाट पाहिल्यानंतरही पाऊस थांबला नाही. यामुळे शेवटी हा सामना रद्द करण्यात आला.
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचे ठरवले. फलंदाजीला उतरलेल्या भारताची पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी चांगलीच वाट लावली. कर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल अणि विराट कोहली यांचे त्रिफळ उडवत पाकिस्तान गोलंदाजाने त्यांचा दबदबा वाढवला. यात शाहीनशाह आफरीदीने रोहित आणि विराटला तंबूचा रस्ता दाखवला. तर हॅरिस रौफने शुभमनच्या बत्त्या गुल करत भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या श्रेयस अय्यरला झेलबाद केले.
अशा स्थितीत भारीतय संघाचा भार संभाळला तो युवा यष्टिरक्षक फलंदाज ईशान किशन आणि उपकर्णधार हार्दिक पंड्या 66 धावांवर 4 बाद असताना ईशान आणि हार्दिकने 138 धावांची भागीरी केली. ईशान 81 चेंडूत 82 धावा करून बाद झाला तर हार्दिकने 90 चेंडूत 87 धावा केल्या यामुळे भारीतय संघने 266 धावांचा पल्ला गाठला. परंतू पावसामुळे सामना रद्द करण्यात आला. (asia cup 2023 afghanistan vs bangaladesh match)
महत्वाच्या बातम्या-
डॉ.प्रमोद मुळे स्मृती करंडक पुणे जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत मोहिल ठाकुर, स्पृहा बोरगांवकर यांना विजेतेपद
‘नवीन चेंडूने हेच करायचे होते’, रोहित-विराटची विकेट घेतल्यानंतर काय म्हणाला शाहीन आफ्रिदी