बुधवारी (दि. 19 जुलै) आशिया चषक 2023 स्पर्धेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर झाले. ही स्पर्धा 30 ऑगस्ट ते 17 सप्टेंबरदरम्यान पार पडणार आहे. या स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 2 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. हा सामना श्रीलंकेच्या कँडी या मैदानावर खेळला जाईल. या सामन्यासाठी क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशात आजी-माजी खेळाडूंनी भारत-पाकिस्तान सामन्याविषयी आपली मते मांडण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये पाकिस्तानचा माजी कर्णधार वकार युनूस याने मोठे भाष्य केले आहे. त्याने आपल्या संघाच्या विजयाविषयी मोठा दावा केला आहे.
तीन वेळा भिडणार भारत-पाकिस्तान?
भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघ 2 सप्टेंबर रोजी एकमेकांशी भिडेल. यानंतर पुन्हा उभय संघ 10 सप्टेंबर रोजी सुपर 4 फेरीत आमने-सामने असतील. तसेच, दोन्ही आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचण्यात यशस्वी झाले, तर सप्टेंबर महिन्यात तीन वेळा दोन्ही संघ आमने-सामने येऊ शकतात. अशात वकार युनूस (Waqar Younis) याने आशिया चषकाच्या वेळापत्रकाच्या घोषणेसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात भाष्य केले. तो म्हणाला की, पाकिस्तान संघ भारताला कधीही हरवण्याची क्षमता राखतो.
काय म्हणाला वकार युनूस?
युनूस म्हणाला की, “जर तुम्ही आमच्या काळाविषयी बघाल, तर आम्ही कधीच मोठ्या स्पर्धांमध्ये भारताविरुद्ध जिंकलो नाहीत. मात्र, आता चांगली बाब अशी आहे की, हे खेळाडू भारताविरुद्ध मोठे सामने जिंकत आहेत. ही आपल्या सर्वांसाठी एक चांगली बाब आहे. जर आपला संघ आपल्या क्षमतेवर खेळण्यात यशस्वी होत असेल, तर आपण भारताला नक्कीच हरवू शकतो. मग ते भारत, पाकिस्तान किंवा श्रीलंकेत का असेना. आम्ही जर त्यांना ओव्हलमध्ये हरवू शकतो, तर कुठेही मात देऊ शकतो. आमच्याकडे प्रतिभावान खेळाडू आहेत, फक्त त्यांना जाऊन खेळायचे आहे.”
जो संघ दबावात चांगला खेळेल, तो जिंकेल- वहाब रियाज
या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या पाकिस्तान संघाचा खेळाडू वहाब रियाज (Wahab Riaz) यानेही भारत-पाकिस्तान सामन्याविषयी भाष्य केले. तो म्हणाला की, “या सामन्याचा रोमांच वेगळ्या स्तरावर पाहायला मिळतो. जो संघ सामन्याच्या दिवशी दबाव चांगल्या प्रकारे पेलेल, तो संघ यशस्वी होईल. तो संघ मैदानावर चांगला खेळ खेळताना दिसेल.”
I am happy to announce the schedule for the highly anticipated Men's ODI #AsiaCup2023, a symbol of unity and togetherness binding diverse nations together! Let's join hands in the celebration of cricketing excellence and cherish the bonds that connect us all. @ACCMedia1 pic.twitter.com/9uPgx6intP
— Jay Shah (@JayShah) July 19, 2023
उभय संघातील शेवटचा वनडे सामना
विशेष म्हणजे, भारत आणि पाकिस्तान (India And Pakistan) या संघांमध्ये द्विपक्षीय मालिका खेळली जात नाही. हे दोन्ही आशिया चषक आणि आयसीसी स्पर्धांमध्ये एकमेकांशी भिडताना दिसतात. अशात यावेळी आशिया चषक 50 षटकांचा असणार आहे. तसेच, दोन्ही संघात 2019 विश्वचषक स्पर्धेनंतर पहिल्यांदाच आशिया चषक 2023 स्पर्धेत 50 षटकांचा म्हणजेच वनडे सामना खेळला जाईल. (asia cup 2023 former pakistan captain waqar younis talked about india vs pakistan match read here)
महत्त्वाच्या बातम्या-
मोईन अलीच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला लॅब्यूशेन, चेंडू मिस करताच झाला मोठा गेम, पाहा व्हिडिओ
श्रीलंकेत जाऊन पाकिस्तानने जिंकली पहिली कसोटी, भारत-इंग्लंडच्या विक्रमाला तडा