आशिया चषकातील महासामना भारतविरुद्ध पाकिस्तान 2 ऑक्टोंबरला खेळला जाणरा आहे. अशातच या सामन्याची वाट जागतिक क्रिकेट प्रेमी पाहत आहेत. अनेक दिवसांपसून चर्चा होणाऱ्या या सामन्याच्या रोज वेगवेगळ्या बातम्या समोर येत असतात. हा महासामना श्रीलंकेत खेळवला जाणार आहे. यातच श्रींलकेत पावसचे वातावरण असल्यामुळे सामन्या दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात होती. पंरतु, क्रिकेट चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
अनेक दिवसांपासून बहुचर्चीत असलेल्या भारतविरुद्ध पाकिस्तान या सामन्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आता श्रीलंकेतून एक महत्वाची बातमी समोर आली आहे, बातमीनुसार पावसाचे वातावरण निखळ झाले आहे. ढग निघून गेले आहेत. अशी बातमी समोर आली आहे. आता पावसाला सुरवात होण्याआधी हा सामना लवकर चालू व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे.
दरम्यान भारतीय संघ आशिय चषकातील पहिलाच सामना जिंकून स्पर्धेला सुरवात करण्याच्या बेतात मैदानात उतरेल. तसेच पाकिस्तान संघाने नेपाळ संघाला 238 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास गगनाला भिडला आहे. भारत-पाकिस्तान सामन्यात पाकिस्तान आपल्या सलग दुसऱ्या विजयाच्या शोधात भारतीय संघापुढे उतरेल.
आशिया चषकत भारत आणि पाकिस्तान सामन्यांचे आमने-सामने रेकॉर्ड
आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान 13 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यातले भारतीय संघाने 12 पैकी 7 सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानने 5 सामने जिंकले आहेत. यातल्या एका सामन्याचा निकाल लागला नाही.
आशिया चषकातील हा सामना फक्त या स्पर्धे पुरताच मर्यादित नसणार आहे. यानंतर या वर्षी भारतीय संघाने आयोजलेल्या विश्वचषकाला सप्टेंबर महिनयात 5 तारखेला सुरवात होणार आहे. विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान 14 सप्टेंबरला आमने-सामने असणार आहेत. त्यामुळे दोन्ही संघ आशिया चषकातील हा सामना जिंकून आपले वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न करेल. (asia cup 2023 india vs pakistan match weather update)
महत्वाच्या बातम्या-
सलग दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने उडवला न्यूझीलंडचा धुव्वा! ब्रुक-बेअरस्टोची वादळी फलंदाजी
‘…तर पाकिस्तान संघ अडचणीत सापडू शकतो’ भारत-पाक सामन्यापूर्वी अख्तरची धक्कादायक भविष्यवाणी