आशिया चषक 2023 मधील बहुप्रतिक्षित भारत-पाकिस्तान सामन्याला शनिवारी (2 सप्टेंबर) सुरुवात झाली. कॅंडी येथे होत असलेल्या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी भारतीय संघात ईशान किशन याला संधी मिळाली असून, जसप्रीत बुमराह मोठ्या कालावधीनंतर वनडे संघात पुनरागमन करत आहे.
तब्बल चार वर्षानंतर दोन्ही संघ आमने-सामने येत आहेत. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघात या सामन्यात दुखापतग्रस्त केएल राहुलच्या जागी ईशान किशन खेळताना दिसेल. तर मुख्य वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्या जागी अष्टपैलू शार्दुल ठाकूर याला संधी मिळाली.
पाकिस्तान संघाचा विचार केल्यास त्यांनी नेपाळविरुद्धचा विजयी संघ कायम ठेवला. पाकिस्तानने आपल्या पहिल्या सामन्यात तब्बल 238 धावांनी विजय मिळवला होता.
भारत प्लेईंग इलेव्हन– रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज
पाकिस्तान प्लेईंग इलेव्हन- फखर झमान, इमाम उल हक, बाबर आझम (कर्णधार), सलमान अली, मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ व नसीम शाह.
(Asia Cup 2023 India Won Toss Against Pakistan And Elected Bat First)
हेही वाचाच-
बिग ब्रेकिंग! बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा, बदलून टाकला कर्णधार; वाचा
‘ईशानने ओपन करावे तर, विराटने 4 नंबरवर फलंदाजी करावी’, भारतीय माजी खेळाडूचे वक्तव्य