आशिया चषक 2023 साठी अवघ्या दोन दिवसांचा वेळ बाकी आहे. रविवारी (27 ऑगस्ट) पाकिस्तान क्रिकेट संघ मुलतानमध्ये दाखल झाला. स्पर्धेचा पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात मुल्तान क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. याच सामन्यासाठी बाबर आझम याच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघ तायर असल्याचे पाहायला मिळाले.
आशिया चषकापूर्वी पाकिस्तान संघाने अफगाणिस्तानविरुद्धचा मालिका वनडे मालिका खेळली आहे. उभय संघांतील ही तीन सामन्यांची वनडे मालिका श्रीलंकेत पार पडली. याच पार्श्वभूमीवर मालिका संपल्यानंतर पाकिस्तान संघ श्रीलंकेमधून मुलतानमध्ये दाखल झाला आहे. याठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांचा भव्य स्वागत देखील झाले. पाकिस्तान क्रिकेटच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. हॉटेल स्टाफकडून सर्व खेळाडूंना शॉल देऊन पाहुणचार केला गेला. पाकिस्तान अफगाणिस्तानविरुद्धची वनडे मालिका 0-3 अशा फरकाने नावावर केली. अफगाणिस्तानला मालिकेतील एकही सामना जिंकता आला नाही.
Next stop: Asia Cup
The boys travel from Colombo to Multan 🛬#AsiaCup2023 pic.twitter.com/3YQLD0nbLg
— Pakistan Cricket (@TheRealPCB) August 27, 2023
📸📸 Snapshots from the arrival at the team hotel in Multan.#AsiaCup2023 pic.twitter.com/EWWiltmUOZ
— Pakistan Cricket (@TheRealPCB) August 27, 2023
दरम्यान, आशिया चषक 2023 हायब्रिड मॉडेलवर खेळला जाणार आहे. स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र भारतीय संघाने आशिया चषकासाठी पाकिस्तानमध्ये जाण्यास स्पष्ट नकार दिला होता. याच पार्श्वभूमीवर पीसीबी आणि बीसीसीआय अनेकदा आमने सामने आल्याचेही दिसले. पण अखेर पीसीबी हायब्रिड मॉडेलवर आशिया चषक खेळवण्यासाठी तयार झाले. आता स्पर्धेतील चार सामने सामने पाकिस्तानमध्ये, तर 9 सामने श्रीलंकेत खेळला जाणार आहेत. भारतीय संघ एकही सामना पाकिस्तानमध्ये खेळणार नाहीये. पाकिस्तान, भारत आणि नेपाळ हे तीन संघ ग्रुप ए मध्ये आहेत. दुसरीकडे श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे तीन संघ ग्रुप बी मध्ये आहेत. (Asia Cup 2023 । Pakistan team arrived in Multan for the first match, received a warm welcome at the hotel)
महत्वाच्या बातम्या –
‘तो माझ्या नेतृत्वातही खेळला आहे…’, माजी सलामीवीराने वनडेत सूर्यकुमारसाठी सुचवली खास बॅटिंग पोझिशन
BREAKING: स्मृतीची सदर्न ब्रेव्हज बनली ‘द हंड्रेड’ची चॅम्पियन, सुपरचार्जर्सच्या पदरी निराशा