भारतीय संघाला आशिया चषक 2023 चा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान सोबत खेळायचा आहे. उभय संघांतील हा सामना शनिवारी (2 सप्टेंबर) कँडीमध्ये खेळला जाणार आहे. उभय संघातील ही लढत पाहण्यासाठी अनेकजण मागच्या काही महिन्यांपासून वाट पाहत आहेत. तत्पूर्वी शुक्रवारी (1 सप्टेंबर) भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने पत्रकार परिषदेत खास प्रतिक्रिया दिली.
आशिया चषकात ऐन वेळी यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल (KL Rahul) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांना संघात घेतले गेल्यामुळे अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. असे असले तरी, प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या माहितीनुसार राहुल फिटनेसच्या कारणास्तव पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळू शकणार नाहीये. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी पत्रकार परिषदेत रोहित शर्मा (Rohit Sharma) यालाही खेळाडूंच्या फिटनेसबाबत प्रश्न विचारले गेले. रोहितने यावेळी खेळाडूंनी आधीच फिटनेस सिद्ध केल्याचे स्पष्ट केले. आशिया चषक म्हणजे खेळाडूंची फिटनेस तपासण्याची वेळ नाही, असेही रोहितला वाटते.
माध्यमांसमोर रोहित शर्मा म्हणाला, “आशिया चषक ही मोठी स्पर्धा आहे आणि याला खूप मोठा इतिहास देखील आहे. ही काही फिटनेस चाचणी नाहीये. हे सर्व मागच्या आठवड्यात बेंगलोरमध्ये झाले आहे.” यावेळी रोहित शर्माने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह () याच्याही फिटनेसबाबत माहिती दिली. बुमराहने नुकतेच आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतून संघात पुनरागमन केले. रोहितकडून त्याच्या फिटनेसबाबत माहिती मिळाली की, “जसप्रीत बुमराह चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. संघासाठी हे चांगले संकेत आहेत.”
रोहित पुढे आशिया चषकासाठी संघ निवडण्याच्या प्रक्रियेबाबत देखील बोलला. तो म्हणाला, “संघनिवडीची चिंता नेहमीच चांगली असते. निवडलेल्या संघातूनही प्रत्यक्ष खेळण्यासाठी 11 खेळाडून निवडणे हे आव्हानच असणार आहे. मला आशा आहे की, हे 18 खेळाडू फिन आणि ताजेतवाणे राहतील. यांना येत्या काही महिन्यांमध्ये दुखापत झाली नाही, तर मलाही आनंद असेल.” (Asia Cup 2023 । Rohit Sharma’s statement in the press conference before the match against Pakistan)
आशिया चषक 2023 साठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, ईशान किशन, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्ण.
राखीव खेळाडू – संजू सॅमसन.
महत्वाच्या बातम्या –
‘पाकिस्तान खूपच…’, हायव्होल्टेज सामन्यापूर्वी ‘किंग’ कोहलीची सर्वात मोठी प्रतिक्रिया
Asia Cup 2023: बांगलादेशची पहिल्या सामन्यात फजिती, एका धावेच्या नादात ‘या’ खेळाडूचे हसू