कुसल मेंडिसची 92 धावांची वादळी खेळी, अफगाणी संघापुढे 292 धावांचे लक्ष्य

आशिया चषकात मंगळवारी (5 सप्टेंबर) श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील निर्णायक सामना खेळला जात आहे. श्रीलंकन संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. श्रीलंकेने निर्धारित 50 षटकांमध्ये 8 विकेट्सच्या नुकसानावर 291 धावा केल्या. यात यष्टीरक्षक फलंदाज कुलस मेंडिस याचे योगदान सर्वात मोठे होते. मेंडिस शतक करणार, असे वाटत असतानाच नर्व्हस नाइंटीवर विकेट गमावून बसला.
कुसल मेंडिस (Kusal Mendis) याच्यासह श्रीलंकेसाठी सलामीवीर पाथूम निसांका याने 41 आणि दिमूथ करुणारत्ने याने 32 धावांची खेळी केली. करुणारत्नेच्या रुपात लंकेने पहिली विकेट गमावली, पण त्यानंतर खेळपट्टीवर आलेल्या मेंडिसने धावांचा पाऊस पाडला. मेंडिसने आवल्या डावात 6 चौकार आणि 3 अप्रतिम षटकार मारून 109.52 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. अफगाणिस्तान संघासाठी गुलबादिन नाईब याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच दिग्गज राशिद खान याने 2 विकेट्स घेतल्या. (Asia Cup 2023 Sri Lanka’s target of 292 runs against Afghanistan)
अफगाणिस्तानची प्लेइंग इलेव्हन –
रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झदरन, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, करीम जनात, रशिद खान, मुजीब उर रहमान, फजलहक फारुकी.
श्रीलंकेची प्लेइंग इलेव्हन –
पाथूम निसांका, दिमूथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दासून शानाका (कर्णधार), दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, कसून राजिथा, मथिशा पाथिराना.
महत्वाच्या बातम्या –
शतक हुकले आणि चाहत्यांचे हार्टब्रेक! यष्टीरक्षक फलंदाज आपल्याच चुकीने नर्व्हस नाइंटीवर धावबाद । VIDEO
नेमकं काय घडलं? पत्रकार परिषदेत रोहितला राग अनावर; स्पष्टच बोलला, ‘…मी उत्तर नाही देणार’