भारताचा आशिया चषकाच्या (Asia Cup) 15व्या हंगामात श्रीलंकेकडून दारुण पराभव झाला. दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या या सुपर फोरच्या सामन्यात भारताला 6 विकेट्सने पराभव स्विकारावा लागल्याने अंतिम फेरीत पोहोचण्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. तर या सामन्यांनतर भारतीय संघाला चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. भारतीय खेळांडूमधील अर्शदीप सिंग याच्यावर तर सगळ्यांनीच सोशल मीडियावर राग काढला आहे. त्याच्या बाबतीत एका चाहत्याने राग व्यक्त केल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानंतर भारतीय खेळाडू बसमध्ये चढत असताना एका चाहत्याने अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) याला तूच्छ भाषेत काही शब्द सुनावले. त्या चाहत्याने बससमोर अर्शदीपला शिवीगाळ करत गद्दार आया’ असेही म्हटले. हे ऐकून अर्शदीपही काही वेळ थांबला होता. तर त्या चाहत्यांला भारतीय क्रिडा पत्रकाराने खरीखोटी सुनावली. हा चाहता भारतीय असल्याचे समोर येत आहे.
अर्शदीप हा बसमध्ये चढणारा शेवटचा खेळाडू होता. पाकिस्तान विरुद्ध झेल सोडल्याच्या कारणावरून अर्शदीपला पाहूनच त्या चाहत्याने पंजाबी भाषेत आक्षेपार्ह शब्द बोलले. या घटनेचा व्हिडिओ पाक टीव्ही डॉट टीव्हीने यूट्यूबवर शेयर केला आहे.
भारताच्या या युवा वेगवान गोलंदाजाने पाकिस्तान विरुद्ध झेल सोडल्यापासून तो चाहत्यांच्या टीकेला सामोरा जात आहे. त्याने सुपर फोरमध्ये रविवारी ( 4 सप्टेंबर) झालेल्या सामन्यातील 18व्या षटकात पाकिस्तानच्या आसिफ अली याचा झेल सोडला होता. तर याच सामन्यात अर्शदीपने शेवटचे षटक उत्तम टाकले होते.
23 वर्षीय अर्शदीपचा हा 10वाच आंतरराष्ट्रीय टी20 सामना आहे. चाहत्यांनी त्याला धारेवर धरल्याने विराट कोहली आणि हरभजन सिंग यांच्यासमवेत अनेकांनी त्याची पाठराखण केली आहे.
सुपर फोरमधील भारताचा दुसरा सामना बुधवारी (6 सप्टेंबर) श्रीलंकेविरुद्ध झाला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 8 विकेट्स गमावत 173 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना पथुम निसांका (52) आणि कुसल मेंडीस (57) यांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली. तर दसून शनाका याने 18 चेंडूत नाबाद 33 करत संघाला विजय मिळवून दिला. हा सामना भारताने 6 विकेट्सने गमावला. तर भारताला अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी बाकी संघांवर अवलंबून राहावे लागणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! आयपीएल खेळलेल्या क्रिकेटपटूवर बला’त्काराचा आरोप, 17 वर्षीय मुलीने दाखल केली तक्रार
हार्दिक, रिषभमध्ये फलंदाजी क्रमावरून कंफ्यूजन, शेवटी पंतचा पडला चेहरा; पाहा काय झाले?
ASIA CUP: आशिया चषकातून बाहेर झाल्यानंतरही रोहित म्हणतोय, ‘भारत वि. पाकिस्तान महामुकाबला होणार’