आशिया चषकाच्या (Asia Cup) 15व्या हंगामात आतापर्यंत झालेल्या सामन्यांचे आश्चर्यकारक निकाल पाहायला मिळाले आहेत. सध्या या स्पर्धेचे सुपर फोरचे सामने सुरू आहेत. संयुक्त अमिराती येथे सुरू असलेल्या स्पर्धेत यजमान श्रीलंका संघ उत्तम कामगिरी करत आहे. त्यांनी मंगळवारी (6 सप्टेंबर) भारताचा 6 विकेट्सने पराभव केला. यानंतर आयसीसीने टी20 क्रिकेटची ताजी क्रमवारी जाहीर केली. यामध्ये अनेक बदल पाहायला मिळाले आहेत.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) हा दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तर त्याचा संघसहकारी विकेटकीपर मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) 815 अंकासह पहिल्या स्थानावर आला आहे. यामुळे रिझवान हा आयसीसी टी20 क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारा तिसराच पाकिस्तांनी फलंदाज ठरला आहे.
रिझवान हा आशिया चषकात जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने 3 सामन्यांत 96च्या सरासरीने 192 धावा केल्या आहेत. तर या हंगामात तो आशिया चषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये पहिल्या स्थानावर आहे. त्याने भारत आणि हाँगकाँग विरुद्ध विशेष खेळी करत सामनाविजयाची भुमिका पार पाडली आहे. त्याने भारताविरुद्ध 71 आणि हाँगकाँग विरुद्ध नाबाद 78 धावा केल्या आहेत. तर दुसरीकडे बाबरने 3 सामन्यांत 33 धावा केल्या आहेत. त्याच्याआधी बाबर आणि मिसबाह उल हक हे प्रथम क्रमांकावर पोहोचले होते.
आयसीसी टी20 क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारा तिसराच पाकिस्तानी फलंदाज
बाबर त्याच्या कारकिर्दीत 1156 दिवस आंतरराष्ट्रीय टी20च्या पहिल्या स्थानावर राहिला. तसेच मिसबाह उल हक हा 20 एप्रिल 2008 ते 27 फेब्रुवारी 2009 दरम्यान 313 दिवस पहिल्या स्थानावर होता. आता पाकिस्तानच्या तिसऱ्या फलंदाजाने अशी कामगिरी केली आहे. श्रीलंकेच्या पथुम निसांका हा पण आशिया चषकामध्ये धमाकेदार फलंदाजी करत आहे. त्याने 4 सामन्यांत 110 धावा केल्या आहेत. याबरोबरच तो आठव्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने सुपर फोरमध्ये भारताविरुद्ध 52 धावा केल्या आहेत.
सूर्याचा अव्वल क्रमांक थोडक्यात मुकला
ही स्पर्धा सुरू होण्याआधी भारताचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याला पहिल्या क्रमांकावर येण्याची संधी होती. तो आधी पहिल्या तीनमध्ये होता. आता मात्र तो चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. बाबर 794 अंकासह दुसऱ्या आणि दक्षिण आफ्रिकेचा एडेन मार्करम हा 792 अंकासह तिसऱ्या स्थानावर आहे. तर भारताचा कर्णधार रोहित शर्मा यालाही 3 स्थानांचा फायदा झाला असून तो 14व्या क्रमांकावर आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दीपक हुड्डाकडून गोलंदाजी का करून घेतली नाही?, कर्णधार रोहितने सांगितले कारण
भारतातील ‘या’ मैदानातील स्टँडला दिले भज्जी अन् युवीचं नाव! वाचा सविस्तर
नजरों से नजर मिली.. पंत नव्हे ‘या’ पाकिस्तानी क्रिकेटरसोबत उर्वशीचा भिडलाय टाका? तुम्हीही पाहा