आशिया चषक (Asia Cup) 2022मध्ये मंगळवारी (6 सप्टेंबर) भारत विरुद्ध श्रीलंका सामना दुबई येथे खेळला गेला. या सामन्यात भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहल याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याने या सामन्यात तेव्हा विकेट्स घेतल्या जेव्हा संघाला त्याची नितांत आवश्यकता होती. भारताचा या सामन्यात पराभव झाला असला तरी संघाने श्रीलंकेला चांगलीच टक्कर दिली आहे. यावेळी चहल आणि विराट कोहली यांच्यात चांगली बॉडींग दिसून आली.
या सामन्यात भारताला पहिली विकेट मिळवून देण्यात युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याचा हात आहे. त्याने श्रीलंकेची सलामीजोडी तोडत त्यांच्या अडचणीत वाढ केली. सर्वप्रथम त्याने पाथुम निसांका याला बाद केले. याची विकेट घेताच विराट कोहली (Virat Kohli) हा चहलच्या डोक्याला किस करताना दिसला.
भारताची या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अडखळत सुरूवात झाली. संघाने 174 धावांचे लक्ष्य श्रीलंकेला दिले. त्याच्या प्रत्युत्तरात श्रीलंकेने चांगली सुरूवात केली. श्रीलंकेच्या दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतके केली. त्यांनी 12व्या षटकापर्यंत एकही विकेट गमावली नाही. यावरून श्रीलंकेचे फलंदाज भारताच्या गोलंदाजीवर जड पडताना दिसले. अशा स्थितीत चहल संघाच्या मदतीला धावून आला.
चहलने 12व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूत निसांकाला (52) रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्याकरवी झेलबाद केले. त्यानंतर लगेचच दोन चेंडूनंतर चरित असलांका (0) याला बाद केले. तर 15व्या कुसल मेंडिस याला पायचीत केले. या तिन्ही विकेट पडताच भारताच्या संघात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. याचा खूशी विराटला इतकी झाली की त्याने चहलच्या डोक्याला किस केले. याचा व्हिडिओ सोशम मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
https://twitter.com/MohdFai45667990/status/1567201420725862401?s=20&t=HvpAc_tdaM4bSJ8WfLSHaw
या सामन्यात चहल हा भारताचा नायक ठरला. तर भुवनेश्वर कुमार याने एक विकेट घेतली. बाकी एकाही भारतीय गोलंदाजाला विकेट घेता आली नाही, त्याउलट त्यांनी धावा दिल्या. तर रोहित हा एकमेव भारताचा फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. तसेच श्रीलंकेने या सामन्यांत गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही विभागांमध्ये विशेष कामगिरी केली . यामुळेच त्यांनी हा सामना 6 विकेट्सने जिंकला.