कोणत्याही क्रिकेट सामन्यात फलंदाजाने शून्यावर बाद होणे, ही खूप लाजिरवाणी गोष्ट समजली जाते. आजवर कित्येक क्रिकेटपटूंवर शून्यावर बाद होण्याची नकोशी वेळ आली आहे. नुकतेच या यादीत श्रीलंका क्रिकेट संघाच्या एका फलंदाजाचे नाव जोडले गेले आहे. हा खेळाडू म्हणजे, कुशल मेंडिस.
रविवारपासून (३ जानेवारी) जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका संघात दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना चालू आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंका संघ अवघ्या १५७ धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिका संघाने ३०२ धावा करत पहिल्या डावात १४५ धावांनी आघाडी घेतली. या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाखेर श्रीलंका संघाने ४ बाद १५० धावा केल्या आहेत.
या सामन्यादरम्यान श्रीलंकाचा २५ वर्षीय फलंदाज कुशल मेंडिस विशेष कामगिरी करू शकला नाही. दक्षिण आफ्रिकाच्या गोलंदाजांनी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मेंडिसला या सामन्याच्या दोन्ही डावात भोपळाही फोडू दिला नाही. पहिल्या डावात तो चार चेंडू आणि दुसऱ्या डावात अवघ्या एका चेंडूवर शून्य धावा करत पव्हेलियनला परतला. महत्त्वाचे म्हणजे, यापुर्वी दक्षिण आफ्रिकाविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावातही तो शून्यावर बाद झाला होता.
यासह वरच्या फळीत फलंदाजीला येत कसोटी क्रिकेटच्या सलग ३ किंवा त्यापेक्षा अधिक डावात डक (शून्यावर बाद) करणाऱ्या आशियाई खेळाडूंच्या यादीत त्याचा समावेश झाला आहे. या नकोश्या विक्रमाच्या यादीत माजी भारतीय क्रिकेटपटू पंकज रॉय हे अव्वलस्थानी विराजमान आहेत. त्यांना १९५२ मध्ये सलग दोन कसोटी सामन्यात म्हणजे सलग ४ डावात खाते न उघडता मैदानाबाहेर जावे लागले होते.
Asian batsmen to score 3 or more consecutive Ducks in Tests while batting in Top 4:-
Pankaj Roy: 4 ducks (1952)
Farokh Engineer: 3 ducks (1975)
Rajin Saleh: 3 ducks (2007)
KUSAL MENDIS: 3 ducks (2020-21)#SAvSL— ComeOn Cricket 🏏🇮🇳 (@ComeOnCricket) January 4, 2021
तसेच माजी भारतीय यष्टीरक्षक फलंदाज फारोख इंजिनियर आणि बांग्लादेशचा माजी क्रिकेटपटू रजीन सलेह यांचाही या यादीत समावेश आहे. फारोख इंजिनियर यांनी १९७५ मध्ये सलग ३ डावात डक नोंदवला होता. तर रजीन सलेह हे २००७ मध्ये सलग ३ डावात शून्यावर बाद झाले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
निकाल तर शंभर टक्के लागणार, परंतू पाहा काय आहे श्रीलंका-दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्याची सद्यस्थिती
चालू कसोटी सामन्याच्या शेजारी चिमुकल्यांनी मांडला क्रिकेटचा डाव, फोटो सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ
भारतीय संघ दुसरा कसोटी सामना तर जिंकला परंतू ओढवली १३२ वर्षातील सर्वात मोठी नामुष्की