fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

एशियन गेम्स: पाकिस्तानला हरवत भारतीय पुरूष हॉकी संघाने पटकावले कांस्यपदक

इंडोनेशियात सुरू असलेल्या १८व्या एशियन गेम्समध्ये भारतीय पुरूष हॉकी संघाने पाकिस्तानला २-१ असे पराभूत करत कांस्यपदक पटकावले.

स्पर्धेत चांगली सुरूवात करत उंपात्य सामन्यात भारताला पेनाल्टी शूट-आउटमध्ये मलेशियाकडून ६-७ने पराभव स्विकारावा लागल्याने सुवर्णपदकाच्या आशा संपुष्टात आल्या होत्या.

पाकिस्तान विरुद्धच्या या सामन्यात आकाशदिपने तिसऱ्या मिनिटाला गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पहिल्या सत्रात भारताच्या बचावफळीने विरोधी संघाला कडवी झुंज देत आघाडी कायम ठेवली.

दुसऱ्या सत्रात भारताने आक्रमक सुरूवात करत पाकिस्तानवर दबाब ठेवला. २१व्या मिनिटाला पाकिस्तानला पेनाल्टी कॉर्नर मिळाली होती. पण ती हरमनप्रीत सिंगने अडवली.

३२व्या मिनिटाला एस व्ही सुनिलकडे सरदार सिंग आणि दिलप्रीतमार्फत गोल करण्याची संधी होती पण ती त्याने दवडली. यातच ३९व्या मिनिटाला पुन्हा एकदा पाकिस्तानला पेनाल्टी कॉर्नर मिळाली पण भारताच्या बचावाने तो गोल रोखला.

५०व्या मिनिटाला हरमनप्रीतने गोल करत भारताची सामन्यात पकड मजबूत केली. मात्र त्याच्या पुढच्याच मिनिटाला मुहम्मद आतिकने गोल करत पाकिस्तानचे खाते उघडले.

शेवटच्या काही मिनिटांमध्ये पाकिस्तानने आक्रमण सुरू ठेवले यावेळी रुपिंदर पाल सिंगने पाकिस्तानचे अनेक हल्ले रोखले.

कालच (३१ ऑगस्ट) महिला हॉकी संघाने रौप्यपदक मिळवले आहे. पुरूषांमध्ये पाकिस्तानने एशियन गेममध्ये आठ, दोन कांस्य तर भारताने तीन सुवर्णपदकं मिळवली आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

एशियन गेम्स: बॉक्सिंगमध्ये अमित पांघलला सुवर्णपदक

एशियन गेम्स: भारताला ब्रिज प्रकारात पुरूष दुहेरीत सुवर्णपदक

‘खो-खो’च्या पहिल्या आंतरराष्ट्रीय चॅम्पीयनशिपबद्दल सर्वकाही

भारताने मिळवली एशियन गेम्सच्या इतिहासातील सर्वाधिक पदके

You might also like