fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

एशियन गेम्स कबड्डीत टीम इंडिया आहे या गटात

१८व्या एशियन गेम्सला उद्यापासून सुरुवात होत आहे. तर १९ ते २४ आॅगस्ट या काळात होणार आहेत.

भारताने या स्पर्धेसाठी १२ सदस्यीय पुरुष तसेच महिलांचा संंघ पाठवला आहे. १२ खेळाडूंच्या पुरुषांच्या संघात गिरीश इरनाक आणि रिशांक देवाडिगा या महाराष्ट्राच्या दोन खेळाडूंना तर १२ खेळाडूंच्या महिलांच्या संघात सायली केरीपाळे या महाराष्ट्राच्या एकमेव खेळाडूला संधी देण्यात आली आहे.

पुरुषांच्या स्पर्धेत एकूण ११ संघ सहभागी होणार असुन भारतीय संघ यात अ गटात आहे तर महिलांच्या स्पर्धेत ९ संघ खेळणार असुन यातही भारतीय संघ अ गटात आहे.

पुरुषांच्या गटात अ गटात भारताबरोबर दक्षिण कोरिया, बांगलादेश, थायलंड आणि श्रीलंका आहे तर महिलांच्या अ गटात भारत, थायलंड, जपान, श्रीलंका आणि इंडोनेशिया हे देश आहेत.

असे आहेत  पुरुष संघाचे गट- 

अ गट-  भारत, दक्षिण कोरिया, बांगलादेश, थायलंड आणि श्रीलंका

ब गट- इरान, पाकिस्तान, इंडोनेशिया, जपान, नेपाळ आणि मलेशिया

असे आहेत महिलांचे गट- 

अ गट- भारत, थायलंड, जपान, श्रीलंका आणि इंडोनेशिया

ब गट- इरान, बांगलादेश, दक्षिण कोरिया आणि तैवान

एशियन गेम्ससाठी पात्र ठरलेले ११ पुरुष संघ:

भारत, इंडोनेशिया, इराण, इराक, जपान, कोरिया, मलेशिया, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, थायलंड, बांगलादेश

एशियन गेम्ससाठी पात्र ठरलेले ९ महिला संघ:

भारत, इंडोनेशिया, बांगलादेश, इराण, जपान, कोरिया, श्रीलंका, थायलंड, तैवान.

जागतिक कबड्डीवर भारतीय संघाने नेहमीच आपले वर्चस्व गाजवले आहे. 1990 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेपासून ते अगदी जून महिन्यात झालेल्या कबड्डी मास्टर्स स्पर्धेपर्यंत भारताने नेहमीच आपला दबदबा कायम ठेवला आहे.

त्यामुळेच तमाम भारतीय कबड्डी रसिकांच्या आपल्या भारतीय संघाकडून खूप अपेक्षा आहेत. मात्र त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी भारतीय संघाला इराण, दक्षिण कोरिया, पाकिस्तान आणि बांग्लादेश या संघांच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

2018 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघात सात चढाईपटू आहेत. त्यात प्रो-कबड्डी स्टार खेळाडू अजय ठाकूर, परदीप नरवाल, रिशांक देवाडिगा, रोहित कुमार, राहुल चाैधरी, गंगधारी मल्लेश आणि यंदाच्या लिलावातील सर्वांत महागडा खेळाडू मोनू गोयत यांचा समावेश आहे.

संघाच्या आक्रमणाची धुरा कर्णधार अजय ठाकूर सांभाळणार आहे. तसेच ही आशियाई स्पर्धा ही त्याच्या कारकीर्दीतील दुसरी आशियाई स्पर्धा आहे. त्यामुळेच स्पर्धेतील सर्वोत्तम आक्रमण हे भारताचे अाहे असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही.

भारतीय संघात तीन बचावपटू आहेत. मोहित छिल्लर, राजू लाल चौधरी आणि कबड्डी मास्टर्स स्पर्धेतील सर्वोत्तम बचावपटू गिरीश इरनाक यांच्यावर बचावाची जबाबदारी असेल.

परंतु कबड्डी मास्टर्स स्पर्धेत चांगला खेळ करुनही सुरेंदर नाडा आणि सुरजीत नरवाल यांना वगळण्यात आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

त्याउलट स्पर्धेत खराब प्रदर्शन करूनही राजू लाल चौधरीची झालेली निवड मात्र भारतीय कबड्डी रसिकांसाठी एक रहस्य बनले आहे.

विरोधी संघांच्या चढाईपटूंना रोखण्याची जबाबदारी मोहित आणि गिरीश यांच्यावर असेल. एकूण पाहता भारतीय बचाव सुरजीत नरवाल आणि सुरेंदर नाडा यांच्या अनुपस्थितीत काहीसा कमकुवत वाटतो.

संघात दीपक हुडा आणि संदीप नरवाल यांच्या रूपात अष्टपैलू आहेत. संदीप नरवालने कबड्डी मास्टर्स स्पर्धेत उत्तम खेळाचे प्रदर्शन केले.

परंतु त्याच स्पर्धेत खराब कामगिरी करणाऱ्या दीपक हुडासाठी ही स्पर्धा स्वत:ला सिद्ध करण्याची संधी असेल. याव्यतिरीक्त मनिंदर सिंग आणि अमित नागर हे राखीव खेळाडू आहेत.

भारताने आतापर्यंत सातही आशियाई क्रीडा स्पर्धा सुवर्ण (1990,1994,1998,2002,2006,2010,2014) जिंकले आहेत. तसेच भारताने कबड्डी विश्वचषक (2004,2007,2016), दक्षिण आशियाई स्पर्धा सुवर्ण (2006, 2010, 2016), आशियाई कबड्डी कप (2017) आणि कबड्डी मास्टर्स स्पर्धा (2018) जिंकल्या आहेत.

एकंदरीत पाहता 19 ऑगस्टला अजय ठाकूर आणि त्याची सेना सलग आठवे सुवर्ण जिंकण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल.

पुरुषांचा संघ- गिरीष इरनक, दिपक हुडा, मोहित चिल्लर, संदीप नरवाल, परदिप नरवाल, रिशांक देवडिगा, मोनु गोयत, अजय ठाकूर, रोहित कुमार, राजूलाल चौधरी, मल्लेश गंधारी, राजू चौधरी. स्टॅड बाय- अमीत नागर, मनिंदर सिंग

महिलांचा संघ- साक्षी कुमारी, कविता, प्रियांका, मनप्रीत कौर, पायल चौधरी, रितू नेगी, सोनाली शिंगटे, सायली केरीपाळे, रनदिप कौर खेरा, शालिनी पाठक, उषा नरसिंग, मधू. स्टॅड बाय-  प्रियांका, शमा परविन

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

खेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश

टीम इंडियाने वाहिली अजित वाडेकरांना श्रद्धांजली

नाहीतर सचिन कधीही सलामीवीर झाला नसता…

You might also like