भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान मेलबर्न येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. आपल्या प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या अजिंक्य रहाणेच्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा चारीमुंड्या चीत करत ८ विकेट्सने पराभव केला आहे. या विजयाबरोबरच भारताने अनेक विक्रम देखील आपल्या नावे केले आहे. ऑस्ट्रेलियामध्ये भारताचा हा आठवा कसोटी विजय आहे.
त्यामुळे ऑस्ट्रेलियात ८ विजय मिळवणारा भारत पहिला आशियाई संघ ठरला आहे. भारताने ऑस्ट्रेलियात 4 विजय मेलबर्नमध्ये 2 ऍडलेड येथे तर पर्थ आणि सिडनीमध्ये प्रत्येकी 1 विजय मिळलला आहे.
भारतानंतर ऑस्ट्रेलियामध्ये सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या आशियाई संघांमध्ये पाकिस्तान संघाचा दुसरा क्रमांक येतो. पाकिस्तानने 4 वेळा ऑस्ट्रेलियाचा पराभव केलेला आहे. श्रीलंका व बांगलादेश संघाला ऑस्ट्रेलियामध्ये एकही कसोटी सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळे सध्या तरी ऑस्ट्रेलियात कसोटी सामना जिंकणारे भारत आणि पाकिस्तान हे दोनच आशियाई संघ आहेत.
तसेच भारत आशियातील पहिला संघ आहे, ज्याने ऑस्ट्रेलियामध्ये मालिका विजय मिळवलेला आहे. 2018- 19 साली झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 2-1 ने पराभव केला होता.
सध्या सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील उर्वरित सामन्यात देखील भारतीय संघ उत्तम कामगिरी करून मालिका विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. पहिल्या विजयानंतर संपूर्ण संघाचा आत्मविश्वास वाढला असून कर्णधार अजिंक्यसमोर मालिका विजय मिळवून देण्याचे मोठे आव्हान असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
पैज लावली तरी चालेल.! रहाणेचं शतक आणि टीम इंडियाचा पराभव, शक्यच नाय…
बुम बुम बुमराह! परदेशातील खेळपट्टींवर बुमराहने केलेल्या अफलातून कामगिरीची आकडेवारी
क्या बात अज्जू! ‘जॉनी मुलाघ मेडल’ जिंकणारा अजिंक्य रहाणे ठरला जगातील पहिलाच क्रिकेटपटू