मुंबई । वेगवान गोलंदाज इशांत शर्मा भारताचा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. गेल्या दोन वर्षात त्याने दमदार प्रदर्शन करत भारताला काही महत्त्वपूर्ण सामने जिंकून दिलेत. मैदानावर चांगली कामगिरी होत असल्याने क्रिकेटमध्ये खूप “एन्जॉय’ करतोय, असे इशांत शर्माने मयांक अग्रवालशी बोलताना सांगितले.
आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात इशांत शर्मा स्टीव्ह स्मिथला स्लेजिंग करणार नसल्याचे त्याने सांगितले. 2017 ऑस्ट्रेलियाचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता तेव्हा इशांत शर्मा आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यात बाचाबाची झाली होती. बाचाबाची करताना इशांतच्या हावभावाचे मिम्स सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत होते.
भारताकडून 97 कसोटी सामने खेळणारा इशांत म्हणतो, सध्या मी कारकिर्दीच्या अशा टप्प्यावर आहे की क्रिकेटमधून खूप आनंद घेत आहे आणि ते माझ्यासाठी चांगले आहे. संघासाठी जातीस्त जास्त बळी घेऊन विजय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. जोपर्यंत लोक मला उकसवत नाहीत तोपर्यंत मी प्रतिक्रिया देणार नाही
इशांत म्हणाला, 2017 च्या बंगलोर कसोटीत स्टीव्ह स्मिथची लय बिघडविण्यासाठी प्रयत्न करत होता. कारण तोच भारताच्या विजयातला अडसर होता. त्याला बाद करताच भारताच्या विजयाचा मार्ग सुकर होणार होता म्हणून तो स्मिथवर स्लेज करत होता. विराट देखील आक्रमकतेला कधी विरोध केला नाही पण त्यांचे म्हणणे एवढेच आहे की संघासाठी बळी मिळवून द्या पण प्रतिबंधित होता कामा नये.