भारत ए आणि ऑस्ट्रेलिया ए संघात रविवारपासून (6 डिसेंबर) सराव सामना सुरू होत आहे. या सामन्यात ट्रेविस हेड ऑस्ट्रेलिया ए संघाचे नेतृत्त्व करणार आहे. या सामन्यापूर्वी हेडने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
हेड म्हणाला की, तो भारताच्या अविश्वसनीय गोलंदाजी आक्रमणाविरुद्ध आपल्या कौशल्याचे परीक्षण करेल आणि पहिल्या सराव सामन्यात त्यांच्यावर दडपण टाकण्याचा प्रयत्न करेल.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध 17 डिसेंबर पासून सुरू होणार्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाचा ए संघ भारताच्या ए संघाविरुद्ध दोन सराव सामने खेळणार आहे. ज्यामधे कसोटी तज्ज्ञ खेळाडू मैदानावर उतरतील. भारताविरुद्ध 2018 साली कसोटी मालिकेत राष्ट्रीय संघाचा भाग राहिलेला हेड पहिल्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलिया ए संघाचे नेतृत्व करणार आहे.
हेडने सोनी नेटवर्ककडून आयोजित ऑनलाईन संवाद समेलनामध्ये म्हटले, मागील मालिकेतील आठवणी आणि गोष्टींबद्दल विचार करताना चांगलं वाटतं. परंतु त्यांचा गोलंदाजीचा मारा अविश्वसनीय आहे आणि सर्व चांगल्या पद्धतीने एकमेकांचे समर्थन करतात. तुम्हाला नवीन चेंडूचा सामना केल्यानंतर मोहमद शमीसारख्या गोलंदाजांना खेळायचे असते आणि त्यांच्या लाईन- लेंग्थ खूप चांगली आहे. तुम्ही ढिलाई नाही करू शकत, तुम्हाला प्रत्येक गोलंदाजांचा सामना सावधपणे करावा लागेल.
तो म्हणाला, “कसोटी क्रिकेटमध्ये तुम्ही अशीच अपेक्षा करता, परंतु त्या प्रकारच्या गोलंदाजीविरुद्ध तो (2018) माझा पहिला अनुभव होता. तुम्हाला जास्तीत- जास्त सावध राहावे लागेल. मी कसोटी क्रिकेट सुरू होण्याची पुन्हा प्रतीक्षा करत आहे. जिथे आमच्यासाठी चांगली संधी असेल.”
मालिकेतील पहिला कसोटी सामना 17 डिसेंबर पासून दिवस- रात्र रूपात खेळला जाईल. दौऱ्यातील दुसरा सराव सामना 11 डिसेंबरला होणार आहे. ज्याला गुलाबी चेंडूवर खेळले जाईल. हेड म्हणाला, “हे दोन्ही सराव सामने आमच्यासाठी महत्वाचे असणार आहेत. हे फक्त ऑस्ट्रेलिया ए साठी महत्त्वाचे नसून ऑस्ट्रेलिया संघासाठीही खूप गरजेचे असणार आहेत. आम्ही चांगले खेळून भारताला दबावात टाकण्याचा प्रयत्न करू. मी सामना सुरू होण्याची प्रतीक्षा करत आहे. मला वाटतंय की मी नेट सत्रात भरपूर सराव केला आहे आणि मी दमलेलो नाही. मला ताजेतवाणे वाटत आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियन संघाला मोठा झटका; ‘हा’ खेळाडू टी२० मालिकेला मुकण्याची शक्यता
“त्या खेळाडूला पाहिल्यावर होते राहुल द्रविडची आठवण”
‘…तर तुम्ही कन्कशन सब्स्टिट्यूट घेण्यास पात्र नाही’, भारतीय दिग्गजाची नव्या नियमावर नाराजी
ट्रेंडिंग लेख-
‘कन्कशन सब्सटिट्यूट’ म्हणजे नक्की काय रे भाऊ?
पहिल्या टी२०मध्ये ऑस्ट्रेलियाला चारी मुंड्या चित करण्यात या ५ भारतीय खेळाडूंनी बजावली मोलाची कामगिरी
अखेर तीन दिवसांच्या प्रतिक्षेनंतर एमएस धोनीचे झाले होते कसोटी पदार्पण