बुधवारी (15 फेब्रुवारी) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नवी कसोटी क्रमवारी जाहीर केली. विशेष म्हणजे एकाच दिवसात ही क्रमवारी दोनदा अपडेट झाली. दुपारी या क्रमवारीत भारतीय संघ अव्वलस्थानी पोहोचला होता. मात्र, काही तासानंतर आयसीसीने आपली चूक सुधारत नवी क्रमवारी अपडेट केली. यामध्ये पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या क्रमांकावर कब्जा केला.
आयसीसीने बुधवारी भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आयसीसी कसोटी क्रमवारी जाहीर केली. यामध्ये भारतीय संघ पहिल्या स्थानी तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानी दिसत होता. या क्रमवारीत भारतीय संघाचे 115 तर ऑस्ट्रेलियाचे 111 रेटिंग गुण दर्शवण्यात आलेले. त्यामुळे भारतीय संघ तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचल्याचे दिसून आले. भारतीय संघ चार वर्षानंतर कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानी आल्याने चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या.
Australia remain ahead of India in the @MRFWorldwide ICC Test Team rankings ahead of the second Test in Delhi.https://t.co/8Tcxjqsj5o
— ICC (@ICC) February 15, 2023
परंतु, चाहत्यांना या आनंदावर काही तासांमध्येच विरजण पडले. कारण, भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आयसीसीने पुन्हा एकदा आपली क्रमवारी अपडेट केली. यामध्ये ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर दिसू लागला. या नव्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचे 126 रेटिंग गुण तर भारताचे 115 रेटिंग गुण दिसून आले. यासोबतच चौथ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंड संघ देखील आता पाचव्या क्रमांकावर घसरला. तर पाकिस्तान एका स्थानाच्या प्रगतीसह सहाव्या स्थानी आला आहे.
काही तांत्रिक चुका झाल्यामुळे या गोष्टी घडल्याचे आयसीसी कडून स्पष्ट करण्यात आले. मागील महिन्यात देखील असाच प्रकार घडला होता. त्यावेळी देखील भारतीय संघ या क्रमवारीत पहिल्या स्थानी आलेला.
(Australia are the No.1 ICC Test ranked team again After India were ranked as the No1 Test ranked team five hours back Australia retain their place)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ना भुवी ना चहल! टी20 मध्ये बळींचे शतक बनवणारी पहिली भारतीय बनली दिप्ती
अय्यरचे दिल्लीमध्ये होणार टीम इंडियात कमबॅक? ‘या’ खेळाडूचा पत्ता कट