वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. रविवारी (19 नोव्हेंबर) स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाईल. यजमान भारत आणि पाच वेळचे विश्वविजेते ऑस्ट्रेलिया या अंतिम सामन्यात आमनेसामने येणार आहेत. या अंतिम सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने भारतीय संघ व चाहत्यांना खिजवण्याचे काम केले आहे.
या विश्वचषकात ऑस्ट्रेलिया संघाची सुरुवात चांगली झाली नव्हती. पहिल्या सामन्यात भारत व दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने त्यांना एकतर्फी मात दिलेली. गुणतालिकेत अखेरच्या क्रमांकावर असताना त्यांनी मोठी मुसंडी मारत पुढील सर्व सात साखळी सामने जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर उपांत्य फेरी दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत त्यांनी अंतिम फेरी गाठली.
अंतिम सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्याने अनेक बाबींवर आपले मत व्यक्त केले. या सामन्यात एक लाखापेक्षा जास्त लोक भारतीय संघाला पाठिंबा देत असताना तुम्हाला काय वाटेल असे विचारले असता तो म्हणाला,
“भारतीय संघासाठी चाहते येणार यात शंका नाही. अंतिम सामन्यात भारताला एकतर्फी पाठिंबा असेल. मात्र, या सर्वांना शांत करण्याचे समाधान लाभेल. हाच आमचा उद्देशही आहे.”
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमची प्रेक्षक क्षमता एक लाख 32 हजार इतकी मोठी आहे. हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम असून, अंतिम सामन्याची सर्व तिकिटे विकली गेल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघ मोठ्या पाठिंब्यासह खेळेल.
(Australia Captain Pat Cummins Talk About One Lakh Crowd In ODI World Cup Final)
हेही वाचा-
‘भारताने पहिली बॅटिंग केली, तर संपलं सगळं…’, CWC 2023 Finalच्या एक दिवसाआधी दिग्गजाची भविष्यवाणी
WHOOP: सचिनचा विक्रम मोडताना विराटच्या मनगटावर होते ‘हे’ खास फिटनेस बँड, फीचर्स पाहून चकितच व्हाल