विश्वचषक 2023 स्पर्धेत खराब सुरुवात करणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाने जबरदस्त पुनरागमन केले आहे. ऑस्ट्रेलियाने पुढील तिन्ही सामने जिंकल्यानंतर आता आपल्या सहाव्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्धही धमाकेदार प्रदर्शन केले आहे. शनिवारी ( 28 ऑक्टोबर) न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करताना तब्बल 388 धावा उभ्या केल्या. यामध्ये त्यांच्या फलंदाजाने षटकारांचा पाऊस पाडत एक नवा विक्रम रचला.
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी चुकीचा ठरवला ठरवला. विश्वचषकातील पहिला सामना खेळत असलेल्या ट्रेविस हेड याने वेगवान शतक झळकावले. त्याला डेव्हिड वॉर्नर याने 81 धावांची खेळी करत सुयोग्य साथ दिली. अखेरीस ग्लेन मॅक्सवेल व कर्णधार पॅट कमिन्स यांनी काही मोठे फटके खेळत असलेल्या 388 पर्यंत पोहोचवले.
ऑस्ट्रेलियाने आपल्या या डावत तब्बल 20 षटकार खेचले. हे यावर्षीच्या विश्वचषकातील एका डावात ठोकले गेलेले सर्वाधिक षटकार आहेत. विशेष म्हणजे त्यांनी याच विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध 19 मारण्याची कामगिरी केली होती. ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषकातील सुरुवात खराब झाली होती. भारत, दक्षिण आफ्रिका व श्रीलंका यांच्याविरुद्ध मिळून त्यांचे फलंदाज केवळ सात षटकार ठोकू शकलेले. त्यानंतर पुढील तीन सामन्यात मिळून त्यांनी तब्बल 54 षटकारांचा पाऊस पाडला आहे. यामध्ये पाकिस्तानविरुद्धचे 19 नेदरलँडविरुद्धचे 15 व आता न्यूझीलंड विरुद्धच्या 20 षटकारांचा समावेश आहे.
यामध्ये एकट्या ग्लेन मॅक्सवेल याच्या नावे 11, डेव्हिड वॉर्नर याच्या नावे 18 षटकार सामील आहेत. या व्यतिरिक्त मिचेल मार्श, जोस इंग्लिस यांनी देखील महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
(Australia Hits 54 Sixes In Last 3 Matches In ODI World Cup 2023)
हेही वाचा-
मॅक्सवेलने मारला World Cup 2023चा सर्वात लांब षटकार, तुटला ‘या’ भारतीयाचा रेकॉर्ड, पाहा अफलातून व्हिडिओ
ट्रेविस हेडने रचला मोठा विक्रम, ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला चौथा खेळाडू